Diwali 2025: मुंबई APMC मार्केटमध्ये भेसळयुक्त ड्रायफ्रुट्सचा धोका

0
Diwali 2025: मुंबई APMC मार्केटमध्ये भेसळयुक्त ड्रायफ्रुट्सचा धोका

Diwali 2025: मुंबई APMC मार्केटमध्ये भेसळयुक्त ड्रायफ्रुट्सचा धोका

मुंबई APMC मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना भेसळखोरांनी बदाम, काजू आणि खिसमिसमध्ये रासायनिक द्रावण, रंग व पावडर घालून विक्री सुरू केली. ग्राहकांनी काळजी घ्या.

सायली मेमाणे

पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : दिवाळी २०२५ सणाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणी शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मुंबई APMC मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्स पुरवठा होत असताना काही भेसळखोरांनी या मागणीचा गैरफायदा घेत गोरखधंदा सुरू केला आहे. हे ड्रायफ्रुट्स खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी गंभीर आरोग्यधोक्याचे कारण ठरू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, APMC मार्केटमधील G, H, L विंगमध्ये भेसळयुक्त ड्रायफ्रुट्सची प्रक्रिया सुरू आहे. खिसमिस, काजू आणि बदाम यावर रासायनिक द्रावणाचा वापर करून धुण्याची, त्यावर रंग आणि पावडर टाकून चमकदार बनविण्याची प्रक्रिया केली जाते. नंतर ही वस्तू फ्लेवरमध्ये प्रोसेस करून आकर्षक पॅकिंगमध्ये विक्रीसाठी बाजारात पाठवली जाते.

व्हिडिओंमध्ये दिसून येते की काजू आणि बदामही अशाच प्रकारे प्रोसेस केले जात आहेत. ट्रेमध्ये टाकून फ्लेवरसाठी भट्टीमध्ये ठेवले जात आहे, तर बदाम जमिनीवर उघड्यावर साठवलेले दिसतात. या प्रक्रियेत स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा तसूभरही विचार केला जात नाही. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण होत आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भेसळ कारभारामागे बाजार समितीचे सभापती, संचालक, सचिव आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांचे “आशीर्वाद” असल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांना “लक्ष्मी दर्शन” झाल्यामुळे कारवाई टाळली जात असल्याचे देखील सांगितले जात आहे.

सध्या ड्रायफ्रुट्सचे दर ५०० ते २२०० रुपये किलोपर्यंत आहेत, तर फ्लेवर आणि पॅक केलेले ड्रायफ्रुट्स त्याहून अधिक महाग विकले जात आहेत. या आकर्षक पॅकिंगमागे नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवाळीच्या खरेदीत मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्स पसंत करणाऱ्या ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विक्रेत्यांकडून प्रमाणपत्र, उत्पादनाची शुद्धता आणि पैकिंगची माहिती तपासणे आवश्यक आहे.

या घटनेमुळे स्पष्ट होते की, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सच्या बाजारपेठेत भेसळखोरांची कारवाई वाढत आहे. नागरिकांनी फक्त विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, आणि कोणत्याही संशयास्पद उत्पादने त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवावी.

दिवाळी २०२५ मध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी खरेदीसाठी सजग राहणे गरजेचे आहे, नाहीतर या भेसळखोरांची दिवाळी ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed