Explore Konkan App: एका क्लिकवर कोकण पर्यटनाची संपूर्ण माहिती पर्यटकांसाठी

0
Explore Konkan App: एका क्लिकवर कोकण पर्यटनाची संपूर्ण माहिती पर्यटकांसाठी

Explore Konkan App: एका क्लिकवर कोकण पर्यटनाची संपूर्ण माहिती पर्यटकांसाठी

‘Explore Konkan’ ॲपमुळे पर्यटकांना कोकणातील पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

सायली मेमाणे

पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : कोकण पर्यटन प्रेमींसाठी खास उपक्रम – ‘Explore Konkan’ ॲपने पर्यटन क्षेत्रात नवीन अध्याय सुरू केला आहे. कोकण हे निसर्गसौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. कोकणला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी या सर्व माहितीचे नियोजनबद्ध सादरीकरण हे महत्वाचे होते, यासाठी पर्यटन क्षेत्रात अनुभव असलेल्या सतीश कदम यांनी ‘Explore Konkan’ ॲप तयार केले आहे.

या ॲपमध्ये कोकणच्या विविध पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली आहे. यात समुद्र किनारे, नयनरम्य दृश्ये, ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक मंदिरे, धबधबे आणि इतर नैसर्गिक ठिकाणांचा समावेश आहे. तसेच, कोकणातील प्रमुख सण, यात्रा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि लोकपरंपरेची माहितीही पर्यटकांना मिळणार आहे. स्थानिक हस्तकला, उत्पादनं आणि विशेष वस्तूंची माहिती देखील या ॲपमध्ये दिली आहे.

पर्यटकांसाठी विविध ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीजचा (Adventure Activities) पर्यायही ॲपमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे पर्यटक आपल्या सहलीसाठी योग्य नियोजन करू शकतात. यात जलक्रीडा, ट्रेकिंग, ट्रॅकिंग, बोटिंग सारख्या उपक्रमांची माहिती दिली आहे.

‘Explore Konkan’ ॲपमध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे देशीय तसेच परदेशीय पर्यटकांसाठी माहिती सहज मिळवता येईल. हे ॲप पर्यटकांना कोकणातील संपूर्ण माहिती एका क्लिकवर देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे सहलीचा अनुभव अधिक सोपा, नियोजनबद्ध आणि अविस्मरणीय बनेल.

सतीश कदम यांनी या ॲपची निर्मिती करून कोकण पर्यटनाला नवा वेग दिला आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांना कोकणातील सौंदर्य अनुभवणे, स्थानिक संस्कृती समजणे आणि पर्यटन स्थळांवर नियोजनबद्ध भेट देणे शक्य होणार आहे. पर्यटन क्षेत्रातील ही नवकल्पना कोकणातील पर्यटनाला चालना देईल, असा विश्वास आहे.

एकूणच, ‘Explore Konkan’ ॲप पर्यटन प्रेमींना निसर्गरम्य कोकणाचा अनुभव एका क्लिकवर देणारे अभिनव साधन ठरणार आहे. या ॲपमुळे कोकण पर्यटन अधिक आकर्षक, माहितीपूर्ण आणि आनंददायी बनेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed