Fake IMEI Racket: चोरीचा फोन बनतो ‘नवीन’; दिल्लीतील गुप्त फॅक्टरीचा पर्दाफाश
Fake IMEI Racket: चोरीचा फोन बनतो ‘नवीन’; दिल्लीतील गुप्त फॅक्टरीचा पर्दाफाश
दिल्लीमध्ये नकली IMEI रॅकेट उघड; जुन्या मदरबोर्डवर IMEI बदलून चीनमधील पार्ट्स लावून ‘नवीन’ फोन तयार. पोलिसांनी 1826 फोन आणि उपकरणे जप्त केली.
२८ नोव्हेंबर २०२५ : देशाच्याराजधानी दिल्लीत हायटेक गुन्हेगारीचा एक थरारक प्रकार उघडकीस आला आहे. चोरी, लूट आणि सायबर फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे मोबाईल फोन तयार करणारी एक गुप्त फॅक्टरी दिल्ली पोलिसांनी उध्वस्त केली आहे. या ठिकाणी जुन्या मोबाईल फोनचे मदरबोर्ड स्वस्तात विकत घेऊन, त्यांचे IMEI क्रमांक बदलून आणि चीनमधून आणलेल्या नव्या बॉडी पार्ट्स लावून पूर्णपणे ‘नवीन’ फोन तयार केले जात होते. या फोनचा मूळ मागोवा घेता येत नसल्याने गुन्हेगारांसाठी हे फोन ‘सुरक्षित ढाल’ ठरू लागले होते.
गेल्या दोन वर्षांपासून करोल बाग परिसरात हा अवैध व्यवसाय सुरू होता. दिल्ली पोलिसांनी ‘सायबरहॉक’ या विशेष ऑपरेशनअंतर्गत बीडनपुरा भागातील गल्ली क्रमांक २२ मधील एका व्यावसायिक इमारतीवर छापा टाकला. ‘आदित्य इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड एक्सेसरीज’ या नावाने चालणाऱ्या या युनिटमध्ये पाच जण मोबाईल असेंबलिंग आणि IMEI बदलण्याचे काम करताना आढळले. पोलिसांनी १,८२६ तयार व अर्ध-तयार मोबाईल फोन, लॅपटॉप, IMEI बदलणारे विशेष सॉफ्टवेअर, स्कॅनर, हजारो बॉडी पार्ट्स आणि बनावट IMEI लेबल जप्त केले.
या रॅकेटचा मुख्य गाभा IMEI बदलण्याच्या प्रक्रियेत होता. WRITEIMEI 0.2.2 आणि WRITEIMEI 2.0 सारख्या स्पेशलाईज्ड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोनचा वास्तविक IMEI क्रमांक डिलीट करून त्याऐवजी एक नवा, नकली क्रमांक टाकला जात होता. IMEI बदलला की फोनचे लोकेशन ट्रॅक करणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे गुन्हेगार हे फोन चोरी, सायबर क्राईम, अपहरण, फसवणूक किंवा इतर गंभीर कृत्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरत होते.
या युनिटमध्ये वापरले जाणारे मदरबोर्ड दिल्ली-NCRमधील स्क्रॅप मार्केटमधून खूप कमी दरात विकत घेतले जात. हे मदरबोर्ड बहुतेक वेळा तुटलेल्या, नादुरुस्त किंवा चोरीला गेलेल्या फोनमधून मिळत असल्याची माहिती आरोपींनी दिली. मात्र फोनची बाह्य बॉडी चीनमधून मोठ्या प्रमाणावर मागवली जात होती. हजारो बॉडी पार्ट्सची शिपमेंट दिल्लीमध्ये नियमित पोहोचत होती. जुन्या मदरबोर्ड आणि नव्या बॉडीचा ‘कॉम्बो’ तयार करून त्यावर नकली IMEI टाकल्यानंतर हा फोन पूर्णपणे ‘नवीन’ म्हणून किरकोळ बाजारात विकला जात होता.
करोल बाग, गफ्फार मार्केट आणि NCR मधील इतर मोबाईल बाजारांमध्ये या फोनची विक्री विविध चॅनेल्सद्वारे केली जात होती. महिन्याला शेकडो फोन बाजारात जात असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होत होती. विशेष म्हणजे हे फोन केवळ स्थानिक गुन्हेगारांनाच नव्हे, तर सायबर क्राईम मॉड्यूल्स, आर्थिक फसवणूक करणारे गट आणि interstate गँग्जकडूनही मागणी वाढली होती.
छापेमारीनंतर दिल्ली पोलिसांनी या रॅकेटच्या मूळ स्रोतांचा सखोल तपास सुरू केला आहे. स्क्रॅपमध्ये मदरबोर्ड पुरवणाऱ्या एजंट्सपासून ते चीनमधून पार्ट्स मागवणाऱ्या चॅनेल्सपर्यंत आणि तयार फोन NCR व देशभरात कोणत्या नेटवर्कद्वारे विकले जात होते, याचा डेटा गोळा केला जात आहे. IMEI बदलण्याच्या या धोकादायक तंत्राचा वापर पूर्ण सायबर सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठी आव्हाने निर्माण करतोय, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information