Good News! ट्रेनच्या AC कोचमध्ये ब्लँकेट कव्हरची नव्या सुविधा

0
Good News! ट्रेनच्या AC कोचमध्ये ब्लँकेट कव्हरची नव्या सुविधा

Good News! ट्रेनच्या AC कोचमध्ये ब्लँकेट कव्हरची नव्या सुविधा

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी AC कोचमध्ये ब्लँकेट कव्हरची सुविधा सुरू केली. पायलट प्रोजेक्ट जयपूर-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेची समस्या दूर.

सायली मेमाणे

पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी आणि स्वच्छतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. AC कोचमध्ये बेडरोलमध्ये बेडशीट, पिलो कव्हर आणि टॉवेलसोबत आता ब्लँकेटसाठीही कव्हर उपलब्ध केला जाणार आहे. ही सुविधा प्रवाशांच्या मनातील स्वच्छतेबाबतचा संशय दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

पूर्वी प्रवाशांची नेहमी तक्रार असायची की, त्यांना चादर आणि उशीचे कव्हर नवीन मिळते, पण ब्लँकेट दुसऱ्या प्रवाशाने वापरलेलेच ओढावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून आता उशीच्या कव्हरप्रमाणे ब्लँकेटसाठी नवीन कव्हर देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी जयपूरच्या खातीपुरा रेल्वे स्टेशनवर या नवीन सुविधेची सुरुवात केली. सध्या ही सेवा पायलट प्रोजेक्ट म्हणून जयपूर-अहमदाबाद (असारवा) एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरू करण्यात आली आहे. या पायलट प्रोजेक्टच्या पहिल्या दिवशी, रात्री ८:४५ वाजता जयपूरहून सुटणाऱ्या ट्रेनच्या AC कोचमधील प्रवाशांना पारंपरिक सांगानेरी प्रिंटचे (Sanganeri Print) असलेले नवीन कंबल कव्हर पॅकेटमध्ये देण्यात आले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ब्लँकेटचा वापर रेल्वे सिस्टीममध्ये अनेक वर्षांपासून होत आहे, पण प्रवाशांच्या मनात नेहमी संशय असायचा. तो संशय दूर करण्यासाठी ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. पायलट प्रोजेक्टचे निकाल तपासल्यानंतर इतर ट्रेन्समध्ये ही सुविधा विस्तारली जाणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत ६५ लहान व मध्यम स्टेशनवर नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे अपग्रेडेशन, विस्तार आणि एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली (Integrated Passenger Information System) यांचे लोकार्पण केले. राजस्थानमधील सुमारे ६५ स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची, लांबी आणि कव्हर वाढवण्यासह प्रवाशांना माहिती देण्यासाठी साइन बोर्ड लावण्यात आले आहेत.

ही नवी सुविधा फक्त AC कोचमध्ये नाही तर भविष्यात इतर प्रवासी गाड्यांमध्येही लागू केली जाणार आहे. प्रवाशांना स्वच्छतेची खात्री मिळेल तसेच प्रवास अधिक आरामदायी होईल. ब्लँकेट कव्हरमुळे प्रवाशांना पारंपरिक स्वच्छतेच्या तक्रारींवर उपाय मिळेल आणि प्रवासाचा अनुभव सुधारेल.

भारतीय रेल्वेची ही पहिलव्यासची पाऊल प्रवाशांसाठी फायदेशीर असून, स्वच्छता, सुविधा आणि प्रवासी संतुष्टी या तिन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची ठरेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed