Heavy Vehicles Ban: मुंबई-ठाणे वाहतुकीत 10 मोठे बदल; अवजड वाहनांना प्रवेश बंद

0
मुंबई-ठाणे वाहतुकीत 10 मोठे बदल; अवजड वाहनांना प्रवेश बंद

मुंबई-ठाणे वाहतुकीत 10 मोठे बदल; अवजड वाहनांना प्रवेश बंद

मुंबई आणि उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाऊल; सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना 10 मार्गांवर प्रवेश बंद करण्यात आला.

सायली मेमाणे

पुणे १९ सप्टेंबर २०२५ : मुंबई आणि उपनगरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व अवजड वाहनांचे (१० चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त) शहरांत प्रवेश तात्पुरता बंद केला आहे. हा निर्णय सध्या प्रायोगिक तत्वावर महिनाभरासाठी लागू करण्यात आला आहे, ज्याचा उद्देश शहरातील वाहतूक सुरळीत करणे आणि नागरिकांना सुगम प्रवास मिळवून देणे आहे.

ठाणे, घोडबंदर रोडपासून शिळफाटापर्यंत दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत 10 महत्वाचे मार्ग आणि वाहतूक उपविभागातील चेकपोस्टवर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पहिल्या क्रमांकावर कोपरी वाहतूक उपविभाग येतो. मुंबई आणि नवी मुंबईकडून आनंद नगर चेक नाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना येथे प्रवेश बंद करण्यात आले आहे.

दुसऱ्या क्रमांकावर कासारवडवली वाहतूक उप विभाग येतो. मुंबई, विरार वसईहून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना निरा केंद्र, गायमुख घाट येथे प्रवेश बंद करण्यात आले आहे.

वागळे वाहतूक उप विभागाच्या हद्दीत एल.बी.एस. रोड मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना मॉडेला चेक नाका येथे प्रवेश बंद केला आहे.

कळवा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत बेलापूर ठाणे रोडने विटावा जकात नाका मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

मुंब्रा वाहतूक उप विभागाच्या हद्दीत महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येत असलेल्या सर्व अवजड वाहनांना पुजा पंजाब हॉटेल येथे प्रवेश बंद आहे. तसेच तळोजा नवी मुंबई येथून दहिसर मोरी मार्गे कल्याण फाटा येणाऱ्या सर्व अवजड वाहनांनाही दहिसर मोरी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नारपोली वाहतूक उप विभागाच्या हद्दीत गुजरातकडून चिचोंटी नाका मार्गे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना ७२ गाळा, चिंचोटी वसई रोड येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

भिवंडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत वाडा रोडने नदीनाका मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना पारोळ फाटा येथे प्रवेश बंद आहे. याशिवाय वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना धामणगांव, जांबोळी पाईपलाइन नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

शेवटच्या क्रमांकावर कोनगाव वाहतूक उप विभाग येतो. नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना बासुरी संदिल (सरवलीगांव) येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मुंबई-ठाणे परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना प्रवास अधिक सोपा होईल. शहरातील नागरिकांनी या बदलांनुसार प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे वाहतूक कोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. नागरिकांनी मार्गांची माहिती घेत योग्य पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *