Pune Mhada News: अजित पवारांचे निर्देश, म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती

0
Pune Mhada News: अजित पवारांचे निर्देश, म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती

Pune Mhada News: अजित पवारांचे निर्देश, म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती

Pune Mhada News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेत गती देण्याचे निर्देश दिले. खराडी, लोणावळा, दापोडी यासह अनेक प्रकल्पांवर बैठक.

सायली मेमाणे

पुणे १० सप्टेंबर २०२५ : मुंबई – पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्पष्ट निर्देश दिले. मंत्रालयातील समिती कक्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध विषयांवर झालेल्या चर्चेत या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अजित पवार यांनी सांगितले की, सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते आणि आवश्यक सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा. प्रधानमंत्री आवास योजना २.० ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान परवडणाऱ्या दरात सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे, असे निर्देश देताना पवार यांनी मुंबईतील बी.डी.डी. चाळींच्या धर्तीवर उत्तम दर्जाचे बांधकाम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत असे सांगितले. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे, खेड तालुक्यातील रोहकल आणि शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेशही देण्यात आले.

खराडीतील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे, लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास आणि नवीन बांधकाम यासंबंधी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर दापोडी येथील अशोक गृहनिर्माण संस्थेतील पात्र सदस्यांना म्हाडाच्या २० टक्के आरक्षणाऐवजी थेट योजनेत समाविष्ट करावे, असे निर्देश देण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास व गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे तसेच म्हाडा पुणेचे मुख्याधिकारी राहुल साकोरे उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर पुणे आणि परिसरातील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना दर्जेदार घरे, चांगली पायाभूत सुविधा आणि वेळेत प्रकल्प पूर्ण होण्याचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed