IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मिळालं ‘युनिव्हर्स बेबी बॉस’ नाव

0
IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मिळालं ‘युनिव्हर्स बेबी बॉस’ नाव

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रम मिळालं ‘युनिव्हर्स बेबी बॉस’ नाव

राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये ख्रिस गेलचा एका सीझनमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम मोडला. 65 सिक्ससह त्याला ‘युनिव्हर्स बेबी बॉस’ हे नवे नाव मिळाले.

पुणे २८ मे २०२६ : IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने टी-20 क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे विक्रम मोडत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा तब्बल 14 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक विक्रम आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर गेला आहे.

हैदराबादविरुद्धच्या IPL 2026 एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीने तुफानी फलंदाजी करत मैदानात अक्षरशः सिक्सचा पाऊस पाडला. या सामन्यात त्याने 7 षटकार ठोकत एका आयपीएल हंगामात सर्वाधिक सिक्स मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. ख्रिस गेलने 2012 मध्ये एका सीझनमध्ये 59 सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. मात्र, वैभवने आता या सीझनमध्ये तब्बल 65 सिक्स ठोकून नवा इतिहास घडवला आहे.

वैभवची फलंदाजी पाहून स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला. सामन्यादरम्यान जायंट स्क्रीनवर त्याला ‘युनिव्हर्स बेबी बॉस’ असे संबोधण्यात आले. ख्रिस गेलला ‘युनिव्हर्स बॉस’ म्हटले जाते, त्यामुळे वैभवला मिळालेलं हे नवं नाव सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत IPL प्लेऑफ इतिहासातील सर्वात वेगवान हाफ सेंच्युरीची बरोबरी केली. यापूर्वी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. वैभवने 29 चेंडूंमध्ये 97 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने 12 सिक्स आणि 5 चौकार लगावले.

विशेष म्हणजे, त्याच्या या खेळीमुळे ख्रिस गेलचा 30 चेंडूंमध्ये शतक करण्याचा ऐतिहासिक विक्रमही धोक्यात आला होता. मात्र, 97 धावांवर बाद झाल्यामुळे तो विक्रम मोडण्यापासून अवघ्या 3 धावा दूर राहिला. तरीही त्याच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

वैभव सूर्यवंशीने आणखी एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिल्या 6 षटकांत त्याने तब्बल 8 सिक्स मारले. टी-20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये इतके षटकार मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सनथ जयसूर्या आणि जोस बटलर यांनी पॉवरप्लेमध्ये 7 सिक्स मारले होते.

या संपूर्ण आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने 583 धावा केल्या असून त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आता टीम इंडियाच्या दारात त्याची एन्ट्री निश्चित मानली जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया-ए संघात त्याची निवड होण्याची जोरदार चर्चा आहे.

IPL चेअरमन अरुण धुमल यांनीही वैभवचे कौतुक करत त्याला “स्पेशल टॅलेंट” म्हटले आहे. बीसीसीआय त्याच्या प्रगतीवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेटला आणखी एक सुपरस्टार मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed