Jejuri Bhandara Fire: जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला धोकादायक; भंडाऱ्याचा भडका, विजयी नगरसेवकांसह 18 जण भाजले
Jejuri Bhandara Fire: जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला धोकादायक; भंडाऱ्याचा भडका, विजयी नगरसेवकांसह 16 जण भाजले
Jejuri Khandoba Bhandara Fire: निकालाच्या जल्लोषात जेजुरी गडावर भंडाऱ्याचा स्फोट; नवनिर्वाचित नगरसेविकांसह 18 जण भाजले, भेसळयुक्त भंडाऱ्याचा संशय.
पुणे २२ डिसेंबर २०२५ : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना अनेक ठिकाणी जल्लोषाचे वातावरण होते. मात्र खंडेरायाच्या जेजुरीत हा आनंदाचा क्षण भीषण दुर्घटनेत रूपांतरित झाला. मतमोजणी संपल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करताना गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडोबाच्या चरणी भंडारा अर्पण करत असताना अचानक भंडाऱ्याने पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. या घटनेत विजयी नगरसेवकांसह एकूण 18 जण भाजले असून, काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते खंडोबा गडावर दर्शनासाठी गेले होते. गडाच्या पहिल्या पायरीजवळ फटाके वाजवत, भंडारा उधळत विजयाचा जल्लोष सुरू असतानाच अचानक उधळण्यात आलेल्या भंडाऱ्याने पेट घेतला. काही क्षणांतच आगीचा मोठा भडका उडाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की जवळ उभे असलेले अनेक जण त्यात भाजले गेले.
या दुर्घटनेत नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे, त्यांचे पती राहुल घाडगे तसेच प्रभाग क्रमांक ५ मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका कु. स्वरूपा जालिंदर खोमणे यांचाही समावेश आहे. याशिवाय महिला, युवक आणि कार्यकर्ते मिळून एकूण 16 जण या आगीत भाजले गेले. जखमींना तातडीने जेजुरी आणि पुण्यातील खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर जेजुरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा पेटण्यामागे भेसळयुक्त साहित्य वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीही जेजुरीमध्ये भेसळयुक्त भंडारा विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेला अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले असून, जखमींची सविस्तर माहिती घेतली असल्याचे सांगितले आहे. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या दुर्घटनेमुळे जेजुरीतील धार्मिक ठिकाणी होणाऱ्या भंडारा उधळणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाविकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी भंडाऱ्याच्या गुणवत्तेची तपासणी, फटाके वाजवण्यावर नियंत्रण आणि योग्य सुरक्षेची व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्वजण लवकरात लवकर बरे व्हावेत आणि अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information