Karjat News: 60 दिवसांपासून कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेत्र विभागात डॉक्टर नाही

0
Karjat News: 60 दिवसांपासून कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेत्र विभागात डॉक्टर नाही

Karjat News: 60 दिवसांपासून कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेत्र विभागात डॉक्टर नाही

कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात 60 दिवसांपासून नेत्र विभागात डॉक्टर अनुपस्थित; आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांना प्राथमिक नेत्र सेवा मिळत नाही, नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्वरित उपाय करण्याची मागणी केली.

सायली मेमाणे

पुणे १० ऑक्टोबर २०२५ : कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. येथे अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत, मात्र सध्या येथे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नेत्र विभागात 60 दिवसांपासून डॉक्टर अनुपस्थित आहेत. त्यामुळे नेत्र दोष असलेल्या रुग्णांना कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण बहुतांशी आदिवासी आणि दुर्गम गावांमधून येतात. कशेळे ते खांडस, आंबिवली, मेचकरवाडी, पिंपळोळी, गुढवण, सुगवे, लोभेवाडी, ताडवाडी, वारे, लाखाचीवाडी आणि जांबुळवाडी अशा गावांमधून रुग्ण पंधरा ते वीस किलोमीटर प्रवास करून हॉस्पिटलमध्ये येतात. या नागरिकांची आरोग्य सेवा व्यवस्थित होत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

31 मार्च 2025 पासून नेत्र विभागातील डॉक्टरांचे रिटायरमेंट झाले. त्यानंतर सात महिने झाले असून अद्याप नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या कारणास्तव नेत्र तपासणी, चष्मे वाटप, डोळ्यांवरील प्राथमिक उपचार अशा सेवा बंद आहेत. रुग्णांना अनेकदा परत जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात आहे.

स्थानिक आदिवासी समाज आणि नागरिकांनी या परिस्थितीवर लक्ष वेधले असून, आमदार महेंद्र थोरवे यांनी त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. नागरिकांचा दावा आहे की, ग्रामीण रुग्णालयात नेत्र विभागासाठी त्वरित डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास आदिवासी आणि ग्रामीण रुग्णांना प्राथमिक उपचार मिळतील आणि आरोग्याचे तीन तेरा टळतील.

रुग्णालयात दंत विभागासाठी डॉक्टर उपलब्ध असले तरी, डोळ्यांच्या उपचारासाठी सध्या कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा या भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावित होऊ शकते.

कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभाग सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य अधिकारी सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी वारंवार अर्ज केले आहेत, मात्र अद्याप समाधानकारक उपाययोजना झाली नाही.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed