Karjat News: मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

0
Karjat News: मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat News: मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Karjat Rain Update: कर्जत तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या असून प्रशासनाने अद्याप स्थलांतर केलेले नाही.

सायली मेमाणे

पुणे २० ऑगस्ट २०२५ : कर्जत (Raigad Rain Update): कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या संततधारेमुळे तालुक्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळल्याची घटना घडली असून या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.

गेल्या ४८ तासांपासून कर्जत (Karjat Rain) परिसरात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. तालुक्यातील तिन्ही नद्या व नाले पावसामुळे पाणीपातळी वाढून वाहत असले तरी अजूनही धोक्याच्या पातळीवर गेलेले नाहीत. तरीदेखील स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, शेतकरी कुटुंबांचे संसार उघड्यावर येऊन पडले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे जनावरं, धान्यसाठा आणि घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कर्जत तालुका प्रशासनाने अद्याप कोणत्याही दरडग्रस्त किंवा पावसामुळे बाधित कुटुंबांचे स्थलांतर केलेले नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

कर्जत परिसरात आधीच खरीप हंगामासाठी पेरणी झालेली आहे. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांना घराच्या नुकसानीबरोबरच शेतीच्या हानीचीही चिंता सतावते आहे.

स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठ, नाल्याजवळ किंवा ढिगाऱ्याजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास काही भागात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *