माणिकराव कोकाटे कोर्टात जंगली रमीबद्दल काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे कोर्टात जंगली रमीबद्दल काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात स्पष्ट केले की, त्यांना “जंगली रमी” खेळता येत नाही. मोबाईलवरील जाहिरात बंद करताना व्हिडिओ तयार झाला आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केला.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : कोर्टात माणिकराव कोकाटे यांनी जंगली रमी प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, त्यांना जंगली रमी खेळता येत नाही. मोबाईलवर अचानक “जंगली रमी” ची जाहिरात दिसल्याने ती बंद करण्यासाठी त्यांना सुमारे 15 ते 20 मिनिटे लागली.
या दरम्यान व्हिडिओ तयार झाला, ज्याचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर शेअर केले. माणिकराव कोकाटे म्हणाले की, त्यांनी माध्यमांमध्ये जाऊन संपूर्ण स्पष्टीकरण दिले, तरीही रोहित पवार यांनी ट्विट थांबवले नाही.
कोकाटे यांनी कोर्टात नमूद केले की, संबंधित व्हिडिओ विधान परिषदेतील आहे. विधान परिषद सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांच्याकडे हा व्हिडिओ कसा पोहोचला, याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणामुळे विधान परिषदेत आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या बाजूने स्पष्ट केले की, हा प्रकार फक्त मोबाईल जाहिरातीशी संबंधित होता आणि त्यांचा त्यात कोणताही सहभाग नव्हता.
कोर्टात दिलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रकरणाची पुढील कारवाई काय होईल, याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे. हा प्रकरण सामाजिक आणि राजकीय चर्चेस कारणीभूत ठरले आहे.