Kolhapur Heart Attack Death: 10 वर्षीय मुलाचा खेळता खेळता मृत्यू, हृदयविकाराचा वाढता धोका चिंताजनक

0
10 वर्षीय मुलाचा खेळता खेळता मृत्यू, हृदयविकाराचा वाढता धोका चिंताजनक

10 वर्षीय मुलाचा खेळता खेळता मृत्यू, हृदयविकाराचा वाढता धोका चिंताजनक

कोल्हापूरच्या कोडोली गावात १० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. बालकांमध्ये वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण वैद्यकीय क्षेत्रासाठी गंभीर चिंता.

सायली मेमाणे

पुणे ५ सप्टेंबर २०२५ : कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वत्र चर्चेत आहे. कोडोली गावातील अवघ्या १० वर्षीय श्रावण गावडे या बालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात मित्रांसोबत खेळत असताना घडलेली ही घटना पाहून गावातील नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ हतबल झाले आहेत.

श्रावण गावडे आपल्या गणेश मंडळाच्या मंडपात मित्रांसोबत आनंदाने खेळत होता. खेळण्याच्या ओघात त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. शरीर थकल्यासारखे जाणवल्याने तो त्वरित खेळ थांबवून आपल्या आईकडे गेला. आईच्या मांडीवर डोके ठेवताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणांतच त्याचा प्राण कंठाशी आला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेने गावातील वातावरण एकदम बदलले. आनंदात न्हालेलं वातावरण एका क्षणात शोकमग्न झालं. श्रावणच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ग्रामस्थ या घटनेने अत्यंत व्यथित झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचा धोका फक्त वयोवृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुण आणि अगदी लहान मुलांमध्येही हृदयविकाराचे झटके आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. यामागे ताणतणाव, असंतुलित जीवनशैली, चुकीचे आहार पद्धती, प्रदूषण आणि अनुवांशिक कारणे अशी अनेक कारणे दिली जातात. बालकांना हार्ट अटॅकचा धोका वाढत असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

वैद्यकीय तज्ञांच्या मते, लहान वयातील मुलांमध्ये अचानक हार्ट अटॅक येणे ही एक गंभीर बाब आहे. मुलांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवणे, योग्य आहार, नियमित तपासण्या आणि शारीरिक हालचाली वाढवणे हे आवश्यक ठरते. तसेच मुलांच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे काळाची गरज असल्याचे ते सांगतात.

श्रावण गावडेच्या मृत्यूमुळे कोडोली गावच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा शोकमग्न झाला आहे. गणेशोत्सवाच्या आनंदात अचानक आलेल्या या दु:खद घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. समाजाने आणि कुटुंबांनी यापुढे लहान मुलांच्या आरोग्याबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed