Learning Driving License Rules Update: लर्निंग लायसन्स प्रक्रियेत महत्त्वाचे बदल

0
लर्निंग लायसन्स प्रक्रियेत महत्त्वाचे बदल

लर्निंग लायसन्स प्रक्रियेत महत्त्वाचे बदल

आरटीओच्या लर्निंग लायसन्स प्रक्रियेत बदल होणार; वाहन चालकांना फक्त ऑनलाइन परीक्षा आणि कागदपत्र तपासणीवर अवलंबून न राहता प्रशिक्षणाची अधिक जबाबदारी घ्यावी लागणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचना दिल्या.


सायली मेमाणे

पुणे १३ सप्टेंबर २०२५ : वाहन चालवण्यासाठी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ही सर्व वाहनचालकांसाठी पहिली पायरी असते. मात्र, अनेकदा लर्निंग लायसन्स प्रक्रियेतील सध्या चालू असलेली सोपी परीक्षा आणि कागदपत्र तपासणी पुरेशी नसल्यामुळे काही वाहनचालक गैरवर्तन करत असल्याचे आढळते. या परिस्थितीला लक्षात घेऊन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्याचे ठरवले आहे.

सध्याच्या प्रक्रियेनुसार, आरटीओकडून लर्निंग लायसन्ससाठी अर्जदारांना फक्त काही कागदपत्रे सादर करावी लागतात आणि ऑनलाइन टेस्ट उत्तीर्ण करावी लागते. यानंतर काही महिन्यांसाठी लर्निंग लायसन्स दिला जातो आणि नंतर अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्स मिळतो. मात्र सरनाईक यांनी सांगितले की, केवळ कागदपत्र तपासणी आणि ऑनलाइन चाचणी पुरेशी नाही. अनेक वाहनचालकांना वाहन चालवण्याचा योग्य अनुभव नसतानाही लर्निंग लायसन्स मिळत असल्याचे पाहून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

मुंबई सेंट्रल आरटीओच्या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी लायसन्स टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, लर्निंग लायसन्स जारी करताना अर्जदारांचे योग्य प्रशिक्षण, वाहन चालवण्याचे कौशल्य आणि जबाबदारी यावर अधिक भर दिला पाहिजे. काही वाहनचालक ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी खोटे नावे किंवा फोटो वापरून अर्ज करत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत.

सरनाईक यांच्या माहितीनुसार, काही अर्जदारांना वाहन चालवण्याची प्राथमिक माहिती देखील नाही आणि तरीही ते लर्निंग लायसन्स मिळवून रस्त्यावर धोकादायक वर्तन करतात. हे केवळ त्यांच्यासाठी नाही, तर इतर वाहनचालकांसाठीही जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नवीन सुधारित प्रक्रियेत अर्जदारांना अधिक प्रबोधन देण्यावर भर देण्यात येणार आहे.

लर्निंग लायसन्स जारी करण्याच्या प्रक्रियेत दोन सहायक मोटार वाहन निरीक्षकांना सुध्दा जबाबदार ठरवण्यात येणार आहे, जेणेकरून कोणत्याही अर्जदाराला अर्ज करताना धोका निर्माण होणार नाही. अर्जदारांना फक्त ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी नव्हे तर प्रत्यक्ष वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे दाखवावे लागणार आहेत.

सरकारच्या या नवीन निर्णयामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेवर अधिक भर पडेल. लर्निंग लायसन्स प्रक्रियेत सुधारणा करून अर्जदारांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक वर्तन कमी होईल आणि सर्वांसाठी सुरक्षित वाहतूक सुनिश्चित होईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed