LPG Portability Plan: मोबाईलप्रमाणे बदला तुमची गॅस कंपनी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
LPG Portability Plan: मोबाईलप्रमाणे बदला तुमची गॅस कंपनी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LPG Portability Plan: मोबाईलप्रमाणे बदला तुमची गॅस कंपनी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LPG Portability Plan मुळे ग्राहकांना आता गॅस कंपनी बदलण्याची मुभा मिळणार आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखेच हे नवे नियम ग्राहकांना उत्तम सेवा आणि अधिक पर्याय उपलब्ध करून देतील. जाणून घ्या LPG इंटरऑपरेबिलिटीबद्दल सविस्तर माहिती.

सायली मेमाणे

पुणे २९ सप्टेंबर २०२५ : देशातील गॅस ग्राहकांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. आपण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखे आपल्या गॅस कंपनीलाही बदलू शकाल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) आहे. ‘एलपीजी इंटरऑपरेबिलिटी’ (LPG Interoperability) या नव्या योजनेवर नियामक मंडळाने मसुदा तयार केला असून भागधारकांसोबतच ग्राहकांकडूनही मते आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस कनेक्शन बदलता न येता ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे गॅस कंपनी बदलण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

सध्या गॅस ग्राहकांना केवळ स्थानिक डीलर बदलण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र अनेकदा स्थानिक वितरकांकडे कामकाजाच्या अडचणींमुळे ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे पर्याय मर्यादित राहतात. ग्राहकांच्या सेवेत सुधारणा व्हावी आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी PNGRB ने नवा प्रस्ताव पुढे आणला आहे. सिलेंडरची किंमत एकसमान असताना ग्राहकांना डीलर आणि कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, असेही नियामक मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केवळ डीलर नव्हे तर कंपनीही बदलता येईल.

यापूर्वी 2013 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने काही जिल्ह्यांमध्ये पायलट पोर्टेबिलिटी योजना सुरू केली होती. जानेवारी 2014 पर्यंत देशातील 480 जिल्ह्यांपर्यंत याचा विस्तार करण्यात आला. मात्र त्या वेळी केवळ डीलर बदलण्याचा पर्याय होता, गॅस कंपनी बदलण्याची परवानगी नव्हती. कारण कायद्यानुसार, एका विशिष्ट कंपनीचा सिलेंडर फक्त त्याच कंपनीकडे रिफील करणे बंधनकारक होते. त्यामुळे कंपन्यांमधील पोर्टेबिलिटी शक्य नव्हती.

आता परिस्थितीत बदल होत असून PNGRB प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये पोर्टेबिलिटी देण्याचा विचार करत आहे. ग्राहकांना वेळेवर रिफील मिळावे, पुरवठा सुरळीत राहावा आणि सेवा दर्जा उंचवावा या हेतूने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. नियामक मंडळाने ग्राहक, वितरक, नागरी समाज संस्था आणि इतर भागधारकांकडून वेळेवर रिफील सुविधेबाबत मते मागवली आहेत. प्राप्त सूचनांवर आधारित नियम व मार्गदर्शक तत्त्वे तयार करून याची अंमलबजावणी देशभरात करण्यात येणार आहे.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच LPG पोर्टेबिलिटी योजना ग्राहकांना मोठे स्वातंत्र्य देणार आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या सोयीप्रमाणे सेवा निवडण्याची मुभा मिळेल आणि स्पर्धेतून कंपन्याही चांगली सेवा देण्यास भाग पाडल्या जातील. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसपुरवठ्याच्या क्षेत्रात ही योजना क्रांतिकारक ठरू शकते. ग्राहकांचा विश्वास जिंकत पारदर्शकता वाढवण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed