सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस-शिंदे दाखल; महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट आणि प्रकल्प सादरीकरण

0
सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस-शिंदे दाखल; महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट आणि प्रकल्प सादरीकरण

सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस-शिंदे दाखल; महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट आणि प्रकल्प सादरीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहात दाखल. महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे करार आज होणार.

सायली मेमाणे

पुणे ८ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाचा मार्ग ठरवणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. ‘विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट’ सादरीकरणाच्या या सोहळ्याला राज्य सरकारकडून विशेष महत्त्व दिलं जात आहे.

महाराष्ट्राला 2047 पर्यंत विकसित राज्यांच्या यादीत आणण्यासाठी दीर्घकालीन धोरण या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मांडलं जाणार आहे. औद्योगिक, पायाभूत, शेती, आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांतील विकासाची दिशा यात स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट हे राज्याच्या आगामी धोरणांचा पाया ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमात दुपारी 2 वाजता वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्रातील जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी या प्रकल्पाला मोठं महत्त्व आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि जलसाठा वाढवण्यासाठी हा प्रकल्प राज्याच्या भविष्यासाठी गेमचेंजर ठरू शकतो.

याशिवाय दुपारी 2.45 वाजता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) आणि एनबीसीसी तसेच हुडको यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला जाणार आहे. या करारामुळे नागपूरसह विदर्भात पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शहरी विकास आणि नवनवीन प्रकल्पांना गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या सादरीकरणामुळे राज्यातील प्रशासनिक अधिकारी, तज्ज्ञ आणि उद्योगजगतातील लोकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. महाराष्ट्राच्या 2047 च्या विकासाचा रोडमॅप या कार्यक्रमातून स्पष्ट होणार असल्यामुळे हा दिवस ऐतिहासिक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया राज्यातील विविध स्तरातून येत आहे.

फडणवीस आणि शिंदे सरकारकडून यापूर्वीही दीर्घकालीन विकास योजनांवर भर देण्यात आला होता. मात्र, 2047 या महत्त्वपूर्ण वर्षाला लक्ष ठेवून तयार केलेलं हे व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे भविष्यातील महाराष्ट्राचा विकास आराखडा ठरणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत जलसंपदा, पायाभूत सुविधा आणि शहरी विकास या तिन्ही क्षेत्रांचा विशेष फोकस आहे. नदीजोड प्रकल्प आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या MoU मुळे या कार्यक्रमाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed