Mumbai Crime News : बहीण दुबईत, भाऊ अमेरिकेत, मुलं CA-इंजिनिअर; तरीही अट्टल चोर! ‘बुटांमुळे’ झाला पर्दाफाश

0
Mumbai Crime News : बहीण दुबईत, भाऊ अमेरिकेत, मुलं CA-इंजिनिअर; तरीही अट्टल चोर! ‘बुटांमुळे’ झाला पर्दाफाश

Mumbai Crime News : बहीण दुबईत, भाऊ अमेरिकेत, मुलं CA-इंजिनिअर; तरीही अट्टल चोर! ‘बुटांमुळे’ झाला पर्दाफाश


Mumbai Crime News: मुंबई-नवी मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या हायप्रोफाईल साखळी चोर मोहन कोकाटेला पोलिसांनी अटक केली. 80 CCTV फुटेज आणि एका सवयीमुळे आरोपी अडकला.

पुणे ०७ जानेवारी २०२६ : मुंबई आणि नवी मुंबई परिसरात महिलांच्या दागिन्यांवर डोळा ठेवून धुमाकूळ घालणाऱ्या एका हायप्रोफाईल साखळी चोराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपीने अत्यंत काळजी घेतली होती. कपडे, हेल्मेट, दुचाकी सतत बदलून तो पोलिसांच्या नजरेतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या एका सवयीमुळे अखेर तो अडकला.

मोहन कोकाटे (वय 49, रा. सायन) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी तब्बल 80 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून या आरोपीचा माग काढला. प्रत्येक चोरीच्या वेळी वेगळे कपडे परिधान करणे आणि डोक्यावर हेल्मेट घालणे, हा त्याचा नेहमीचा पॅटर्न होता. मात्र, प्रत्येक गुन्ह्यात त्याच्या पायातील बूट एकाच प्रकारचे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हीच सवय त्याच्यासाठी घातक ठरली आणि पोलिसांना मोठा धागा मिळाला.

तपासादरम्यान समोर आलेली आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी अनेकांना धक्का देणारी आहे. कोकाटेचे कुटुंब अत्यंत सुशिक्षित असून त्याची बहीण दुबईत तर भाऊ अमेरिकेत राहतो. त्याचा एक मुलगा चार्टर्ड अकाउंटंट (CA) असून दुसरा इंजिनियर आहे. इतकी सुस्थिती असतानाही कोकाटेने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस तपासात उघड झाले की, कोकाटेला ऑनलाइन कॅसिनो आणि जुगाराचे गंभीर व्यसन होते. या व्यसनामुळे त्याने वडिलांसोबत चालवलेला गार्डनिंगचा व्यवसाय गमावला. हळूहळू तो मोठ्या कर्जात बुडत गेला. कर्ज फेडण्यासाठी आणि खर्च भागवण्यासाठी त्याने साखळी चोरीसारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली.

25 जानेवारी रोजी सायन परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्याचा ठोस सुगावा मिळाला. एका महिलेचे मंगलसूत्र चोरून आरोपी पळून गेला होता. विशेष म्हणजे, ते मंगलसूत्र नकली होते. सुरुवातीला संबंधित महिलेने तक्रार देण्यास नकार दिला होता, मात्र पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीने वापरलेली दुचाकी ही नेरुळ येथून चोरीची असल्याचेही निष्पन्न झाले. केवळ जानेवारी महिन्यातच आरोपीविरोधात पाच गुन्हे दाखल झाले असून, त्याने मुंबई परिसरात 20 हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सध्या पोलीस आरोपीचा अधिक तपास करत असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *