मुंबई मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाइन: ३७ किमी, २७ स्टेशन, पूर्ण भूमिगत मार्गिका दसऱ्याला सुरू

0
मुंबई मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाइन: ३७ किमी, २७ स्टेशन, पूर्ण भूमिगत मार्गिका दसऱ्याला सुरू

मुंबई मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाइन: ३७ किमी, २७ स्टेशन, पूर्ण भूमिगत मार्गिका दसऱ्याला सुरू

मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाइन (कुलाबा–बांद्रा–सीप्झ–आरे) ३० सप्टेंबरपासून पूर्णपणे सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम टप्प्याचे उद्घाटन करतील, जे ३७ किमी आणि २७ स्टेशन जोडेल, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये जलद प्रवासाची सुविधा देईल.

सायली मेमाणे

पुणे १७ सप्टेंबर २०२५ : मुंबईकरांसाठी मोठा आनंदाची बातमी आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो-३ अ‍ॅक्वा लाइन म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भूमिगत मार्गिका आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पूर्णपणे सुरू होणार आहे. या मार्गिकेचा शेवटचा टप्पा आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेडपर्यंत आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई मेट्रो-३ अ‍ॅक्वा लाइन ही संपूर्णपणे भूमिगत मेट्रो असून एकूण लांबी 37 किलोमीटर आहे. या मार्गिकेत 27 स्टेशन आहेत, त्यापैकी 26 पूर्णपणे अंडरग्राऊंड आहेत. आरे ते वरळीपर्यंतचा 22.5 किलोमीटरचा मार्गिका आधीच प्रवाशांसाठी सुरू आहे. आता उरलेला शेवटचा 11 किलोमीटरचा टप्पा 30 सप्टेंबरपासून प्रवासी सेवेत येईल. या मार्गिकेमुळे आरे JVLR ते कफ परेड प्रवास केवळ एका तासात पूर्ण करता येईल, तर रस्ते मार्गाने हे अंतर पार करण्यासाठी साधारण दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

मुंबई मेट्रो-३ चे काम दोन टप्प्यात पूर्ण झाले. पहिला टप्पा आरे ते बीकेसीचा होता, ज्याचे उद्घाटन 7 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधानांनी केले. दुसरा टप्पा बीकेसी ते वरळीपर्यंतचा होता जो 9 मे 2025 रोजी सुरू झाला. आता तिसरा आणि शेवटचा टप्पा पूर्ण होऊन शहरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

ही मार्गिका दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडेल तसेच घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांपर्यंत पोहोचणे अत्यंत सोपे होईल. मार्गिकेच्या जवळ अनेक प्रमुख धार्मिक स्थळं, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, पर्यटनस्थळे असून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होईल. कुलाबा, वरळी, दादर, बीकेसी, सांताक्रूझ आणि सीएसएमटीसारख्या प्रमुख भागांना जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे शहरातील वाहतूक कोंडीतून मोठा आराम मिळणार आहे.

मुंबई मेट्रो-३ चा संपूर्ण मार्ग खालीलप्रमाणे आहे: आरे JVLR, सीप्झ, अंधेरी MIDC, मरोळ नाका, CSMIA टी2, सहारा रोड, CSMIA टी1, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स), धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर मेट्रो, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रॅट रोड, गिरगांव, कालबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड.

या भूमिगत मेट्रोमुळे प्रवाशांना वेळेची बचत होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम होईल. मेट्रोच्या मार्गिकेमुळे मुंबईकरांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

मुंबई मेट्रो-३ अ‍ॅक्वा लाइन शहरासाठी केवळ वाहतूक सुविधा नाही तर आर्थिक, पर्यटन आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरेल. शहरातील व्यस्त रस्ते आणि वाहतूक कोंडीतून आराम मिळवून ही मेट्रो नागरिकांना वेगवान आणि सुविधाजनक प्रवासाची संधी देईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *