Mumbai Metro One Ticket: एकाच तिकिटावर चार मेट्रो मार्गांवर प्रवास, कसे बुक कराल?

0
मुंबई आणि उपनगरातील चार मेट्रो मार्गांवर एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे.

मुंबई आणि उपनगरातील चार मेट्रो मार्गांवर एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे.

मुंबई आणि उपनगरातील चार मेट्रो मार्गांवर एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. One Ticket App द्वारे सोपे बुकिंग, तिकीट दर आणि पर्याय जाणून घ्या.

सायली मेमाणे

पुणे २५ सप्टेंबर २०२५ : मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रो नेटवर्कचे विस्तार सुरू आहे, आणि प्रवाशांसाठी आता मोठा सोपा उपाय उपलब्ध झाला आहे. आता One Ticket App वापरून चार मेट्रो मार्गांवर एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. या सुविधा मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि प्रवास अधिक सोयीस्कर करण्यास मदत करेल.

सध्या मुंबई आणि उपनगरात चार मेट्रो मार्गिका सुरू आहेत. त्यामध्ये घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1, दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ, दहिसर-गुंदवली मेट्रो 7 आणि आरे-आचार्य अत्रे चौक मेट्रोचा समावेश आहे. या मार्गिकांवर प्रवास करताना प्रवाशांना तिकीट खरेदी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण One Ticket App वापरून आता एकाच तिकिटावर संपूर्ण प्रवास करता येणार आहे.

One Ticket App वापरणे अत्यंत सोपे आहे. प्रवासी प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करू शकतात. यात प्रत्येक मार्गिकेसाठी वेगळ्या तिकिटाची गरज नाही. उदाहरणार्थ, दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावरून वरळीपर्यंत प्रवास करायचा असेल, तर पूर्वी तीन मार्गिकांसाठी तीन स्वतंत्र तिकीट काढावी लागायची. आता, One Ticket App वापरून हा प्रवास एका तिकिटावर सहज करता येईल.

दहिसर (पूर्व) ते गुंदवलीचा तिकीट ३० रुपये, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे – मरोळ नाका २० रुपये आणि मरोळ नाका ते वरळी ५० रुपये असा आहे. या तिन्ही मार्गिकांचा प्रवास एका तिकिटावरून कसा करता येईल हे अॅपवर स्पष्ट दिलेले आहे. तिकीट खरेदीसाठी कार्ड, नेटबँकिंग किंवा UPI चा वापर करता येतो.

सर्व तिकीट एकाच वेळी काढता येणार असले तरी तिकीट दरात सध्या कोणताही बदल किंवा सवलत लागू केलेली नाही. प्रत्येक मार्गिकेसाठी निश्चित दर कायम राहतात. प्रवाशांना फक्त खरेदी प्रक्रिया सोपी करण्याचा फायदा मिळतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि मेट्रोचा प्रवास अधिक सुकर होतो.

One Ticket App द्वारे प्रवासाचे नियोजन करण्याची सुविधा देखील दिली आहे. प्रवाशांना मार्ग निवडायची सोय आहे आणि तिकीट लगेच बुक करता येते. मुंबईतील आणि उपनगरातील मेट्रो नेटवर्कचा हा एकात्मिक अनुभव प्रवाशांसाठी नविन सुविधा आहे, ज्यामुळे मेट्रोचा वापर वाढेल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *