मुंबईत नौदलाच्या गणवेशात घुसखोर; जवानाची रायफल आणि काडतुसे पळवण्याची घटना

0
मुंबईत नौदलाच्या गणवेशात घुसखोर; जवानाची रायफल आणि काडतुसे पळवण्याची घटना

मुंबईत नौदलाच्या गणवेशात घुसखोर; जवानाची रायफल आणि काडतुसे पळवण्याची घटना

मुंबईच्या कुलाबा भागात नौदलाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात आलेल्या घुसखोराने अग्निवीरची रायफल आणि काडतुसे पळवल्या. ATS आणि मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी करून तपास सुरू केला आहे, नौदलाकडूनही विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

सायली मेमाणे

पुणे ९ सप्टेंबर २०२५ : मुंबई: मुंबईच्या कुलाबा भागात एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 6 सप्टेंबरच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या जवानाची रायफल आणि काडतुसे पळवल्या. या घटनेमुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला असून, ATS आणि मुंबई पोलिस तपासासाठी सर्तक मोडमध्ये आहेत.

सदर व्यक्तीने भारतीय नौदलाचा गणवेश घालून नेव्ही नगर परिसरात ड्युटीवर असलेल्या अग्निवीरला फसवले. त्याने जवानाला सांगितले की, “तुझी ड्युटी संपली आहे, तू आराम कर,” आणि अग्निवीरच्या हातातील रायफल घेतली. त्यावेळी जवानाला त्या व्यक्तीवर संशय आला नाही कारण तो नेव्हीच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात होता. काही वेळातच जवानाला समजले की हा व्यक्ती नौदल अधिकारी नाही, तर घुसखोर आहे.

घटना समजल्यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि नौदल, मुंबई पोलिस तसेच ATS यांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. घटना घडलेल्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासला जात आहे, तसेच तांत्रिक मार्गानेही तपास सुरू आहे. भारतीय नौदलाकडून हा प्रकार गंभीर समजून त्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागरिक आणि सैन्य यंत्रणा सतर्क ठेवण्यासाठी नौदल आणि पोलिसांकडून सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिस आणि ATS संयुक्तपणे आरोपीचा मागोवा घेऊन घटनास्थळी तपास करत आहेत.

या घटनेमुळे शहरातील सुरक्षा यंत्रणा आणि नौदलाच्या संवेदनशीलतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गणवेशाचा गैरवापर करून रायफल पळवण्याची ही घटना गंभीर सुरक्षा धोका निर्माण करणारी ठरली आहे. नागरिकांनी सकाळच्या आणि रात्रीच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले आहे.

मुंबईतल्या हायअलर्टमुळे शहरातील प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि नौदल यंत्रणा एकत्रितपणे सतत तपास करत आहेत. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांचा वापर करून घुसखोराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी नागरिकांनी कोणतीही विचित्र हालचाल न करता पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.

मुंबईतील कुलाबा भागातील ही धक्कादायक घटना सुरक्षा यंत्रणेसाठी सतर्कतेची घंटा आहे, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी नौदल आणि पोलिसांनी उपाययोजना वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed