Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग ३१ मेपूर्वी सर्व नाले स्वच्छ करण्याचे डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

0
Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग ३१ मेपूर्वी सर्व नाले स्वच्छ करण्याचे डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग ३१ मेपूर्वी सर्व नाले स्वच्छ करण्याचे डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

पावसाळ्यापूर्व नालेसफाईला गती. अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पश्चिम उपनगरांत पाहणी करत ३१ मेपर्यंत सर्व नाले स्वच्छ करण्याचे आदेश दिले.


पुणे ०६ मे २०२६ : पावसाळ्यापूर्व तयारीचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पश्चिम उपनगरांतील मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली आहे. या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवार, ५ मे रोजी विविध ठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, ३१ मे ही अंतिम मुदत असून त्याआधी सर्व नाले पूर्णपणे स्वच्छ झाले पाहिजेत.

डॉ. शर्मा यांनी कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील नाल्यांची पाहणी केली. दहिसर येथील पायल हॉटेल जंक्शन, रिव्हर व्ह्यू ब्रिजजवळील दहिसर नदी, मलजल प्रक्रिया केंद्र, आर/मध्य विभागातील म्हात्रे नाला, आर/दक्षिण विभागातील पोईसर नदी आणि लालजी पाडा या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला.

यावेळी त्यांनी विशेष भर देत सांगितले की, नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. काढलेल्या गाळाची विहित वेळेत आणि योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे.

प्रशासनाची कंबर कसली

या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते गणेश खणकर, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, लीना देहरकर, नगरसेविका योगिता पाटील, अंकिता यादव यांच्यासह उपआयुक्त मनीष वळंजू, सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी, डॉ. प्रफुल्ल तांबे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच काटेकोर नियोजन सुरू केले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *