Navi Mumbai Crime: लंडनहून आलेल्या 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आई पैशांच्या लोभात सहकारी

0
लंडनहून आलेल्या 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आई पैशांच्या लोभात सहकारी

लंडनहून आलेल्या 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आई पैशांच्या लोभात सहकारी

पनवेल-तळोजा परिसरात लंडनहून आलेल्या 70 वर्षीय फारुक शेखने 10 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीसह मुलीच्या आईलाही नवी मुंबई पोलिसांनी अटक केली असून प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे.

सायली मेमाणे

पुणे १ नोव्हेंबर २०२५ : नवी मुंबई, 1 नोव्हेंबर 2025 — पनवेल-तळोजा परिसरातून एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लंडनहून आलेल्या 70 वर्षीय वृद्धाने तब्बल दोन वर्षांपासून 10 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अमानुष कृत्यात मुलीचीच आई पैशांच्या लालसेपोटी आरोपीला मदत करत होती. या दोघांनाही नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फारुक अल्लाउद्दीन शेख असून तो मूळचा पुद्दुचेरीचा रहिवासी आहे. सध्या तो आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक आहे. शेख दर दोन ते तीन महिन्यांनी लंडनहून भारतात येत असे आणि तळोजा सेक्टर 20 मधील एका सदनिकेत राहत असे. त्याच परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीच्या आईशी घरकामाच्या निमित्ताने त्याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने आईला विश्वासात घेतले आणि तिच्या लहान मुलीला वारंवार घरी बोलवून अत्याचार सुरू केले.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी शेख हा मुलीला पेयाच्या स्वरूपात मद्य पाजत असे आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. अत्याचारानंतर तो पीडितेला धमकावत असे की, जर तू कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकीन. या भीतीमुळे मुलगी शांत राहिली आणि तब्बल दोन वर्षे हा प्रकार सुरू राहिला.

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, नीलम पवार आणि सरिता गुडे यांच्या पथकाने गुरुवारी या ठिकाणी छापा टाकला. छाप्यात आरोपी शेखला ताब्यात घेण्यात आले आणि पीडित मुलीची सुटका करण्यात आली.

तपासादरम्यान मुलीच्या आईकडून जेव्हा चौकशी करण्यात आली, तेव्हा पोलिसांना हादरवणारी माहिती मिळाली. आरोपी फारुक शेखने घरभाड्याच्या नावाखाली आईला तब्बल अडीच लाख रुपये दिले होते. याशिवाय दर महिन्याला रेशन आणि खर्चासाठी पैसेही देत असे. या आर्थिक मदतीच्या बदल्यात, आईनेच आपल्या मुलीला वारंवार आरोपीच्या घरी पाठवून दिले होते. पैशांच्या लोभात आईने केलेले हे कृत्य अत्यंत अमानुष असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

सध्या आरोपी फारुक शेख आणि मुलीची आई दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका आईने पैशासाठी आपल्या लेकरूला नराधमाच्या हवाली केल्याचे ऐकून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संस्थांनी या घटनेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मुलांच्या सुरक्षेविषयी सतत जागरूक राहावे, त्यांच्या वागण्यात बदल दिसल्यास तातडीने पोलिस किंवा बालसंरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना समाजाने एकत्र येऊन रोखणे गरजेचे असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed