नेपाळ आंदोलनानंतर Gen Z चे बदलेले रूप; रस्ते साफ करून लुटलेलं सामान परत केलं

0
नेपाळ आंदोलनानंतर Gen Z चे बदलेले रूप; रस्ते साफ करून लुटलेलं सामान परत केलं

नेपाळ आंदोलनानंतर Gen Z चे बदलेले रूप; रस्ते साफ करून लुटलेलं सामान परत केलं

भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनानंतर नेपाळचे Gen Z आता रस्ते साफ करताना आणि लुटलेलं सामान परत करताना दिसले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जगभर चर्चेला उधाण आलं आहे.

सायली मेमाणे

पुणे १२ सप्टेंबर २०२५ : नेपाळमधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. जनरल झेडच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आंदोलनाने काही दिवसांतच प्रचंड उग्र रूप घेतलं. आंदोलनादरम्यान अनेक गाड्यांना आग लावण्यात आली, दुकाने लुटण्यात आली आणि शहरानगरांत गोंधळाचे वातावरण पसरले. सोशल मीडियावर या घटनांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल झाले आणि जगभरातून नेपाळकडे लक्ष वेधले गेले. या आंदोलनाच्या दबावामुळे अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला.

मात्र आता या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं आहे. नुकताच नेपाळमधील जनरल झेडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलन करणारे युवक आता रस्ते साफ करताना आणि लुटलेलं सामान परत दुकानदारांना देताना दिसत आहेत. आंदोलनादरम्यान ज्या ठिकाणी गोंधळ आणि विध्वंस झाला होता, त्याच ठिकाणी आता युवकांनी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतलेला दिसतो.

या अनोख्या बदलामुळे सगळेच अचंबित झाले आहेत. सुरुवातीला गोंधळ घालणारे आणि पोलिसांशी झुंजणारे हेच युवक आता जबाबदारीची जाणीव ठेवून समाजासाठी कार्य करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला असून, अनेकांनी याला ‘नेपाळचं बदललेलं रूप’ म्हणून गौरवले आहे.

नेपाळमधील तरुण पिढीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला हे महत्त्वाचं होतं, पण त्यानंतर त्यांनी स्वतः केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचं भान अधिक स्पष्ट होत आहे. रस्ते साफ करणारे, दुकानमालकांना चोरलेला माल परत करणारे युवक पाहून नागरिकांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. आंदोलन केवळ राग व्यक्त करण्यापुरतं न थांबता, त्यातून जबाबदारीची शिकवण मिळावी हा संदेश या कृतीतून दिसतो.

तज्ज्ञांच्या मते, जनरल झेडची ही कृती जगभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचा आवाज पोहोचवताना हिंसा आणि विध्वंस हे उपाय नाहीत, हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. उलट, लोकशाही मार्गाने आवाज उठवून आणि नंतर समाजाच्या पुनर्बांधणीत सहभाग घेऊनच खरी क्रांती घडते, हे नेपाळच्या तरुणांनी दाखवून दिलं आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर याला लाखो व्ह्यूज मिळाले असून, जगभरातील नागरिकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, आंदोलनानंतर जबाबदारी स्वीकारणं हेच खरं नेत्तृत्वाचं लक्षण आहे.

नेपाळच्या आंदोलनातून मिळालेला हा धडा इतर देशांमधील तरुणांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना तोडफोड न करता समाजासाठी सकारात्मक बदल घडवून आणणे ही खरी प्रगती असल्याचा संदेश या घटनेतून जगाला मिळत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed