Netflix कडून मोठा निर्णय! हे 22 गेम्स 14 जुलैपूर्वी हटवले जाणार – अजूनही मोफत खेळण्याची संधी

0
Netflix कडून मोठा निर्णय!

Netflix कडून मोठा निर्णय!

Netflix Games: Netflix 14 जुलै 2025 पूर्वी Hades, Monument Valley, Katana Zero यांसारखे 22 गेम्स हटवत आहे. इंडी गेम्सऐवजी मल्टीप्लेयर व किड-फ्रेंडली गेम्सकडे कंपनीचा कल. संपूर्ण यादी पाहा आणि शेवटची संधी साधा.

सायली मेमाणे

२६ जून २०२५: Netflix आपल्या गेमिंग पोर्टफोलिओत मोठा बदल करत असून 14 जुलै 2025 पूर्वी 22 गेम्स हटवणार आहे. यामध्ये Hades, Monument Valley, Katana Zero, Braid, Raji: An Ancient Epic यांसारख्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या टायटल्सचा समावेश आहे. The Verge च्या रिपोर्टनुसार, या निर्णयामागे कमी युजर एंगेजमेंट आणि कंपनीची नविन स्ट्रॅटेजी आहे. आता Netflix इंडी गेम्सऐवजी मल्टीप्लेयर, फ्रँचायझी बेस्ड आणि मुलांसाठी सुलभ गेमिंग अनुभव विकसित करण्यावर भर देणार आहे.

हे बदल Netflix गेमिंग लायब्ररीतील खूप महत्त्वाचे टायटल्स संपवणार आहेत. Hades गेम 1 जुलै रोजी हटवला जाईल आणि उर्वरित गेम्स 14 जुलैपर्यंत एक्झिट होतील. ही बातमी येताच Netflix गेमिंग ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. विशेषतः, Netflix सब्सक्रिप्शनद्वारे मोबाइलवर हे गेम्स खेळणाऱ्या युजर्ससाठी ही एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. गेमिंग प्रेमींनी 14 जुलैपूर्वी हटवले जाणारे सर्व गेम्स फ्रीमध्ये खेळून घ्यावेत, असा सल्ला Netflix तर्फे देण्यात आला आहे.

हटवले जाणारे गेम्स यादी: Battleship, Braid Anniversary Edition, Carmen Sandiego, CoComelon: Play with JJ, Death’s Door, Diner Out: Merge Cafe, Dumb Ways to Survive, Ghost Detective, Hades, Katana Zero, Lego Legacy: Heroes Unboxed, Ludo King, Monument Valley, Monument Valley 2, Monument Valley 3, Rainbow Six: Smol, Raji: An Ancient Epic, SpongeBob: Bubble Pop F.U.N., TED Tumblewords, The Case of the Golden Idol, The Rise of the Golden Idol, Vineyard Valley.

Netflix चा उद्देश आता त्यांचा गेमिंग सेगमेंट अधिक व्यावसायिक आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. काही गेम्स, जसे की Katana Zero आणि Hades, हे भविष्यात मोबाईल अ‍ॅप स्टोअरवर प्रीमियम टायटल्स म्हणून डिव्हॉल्वर डिजिटलसारखे प्रकाशक पुन्हा रिलीज करतील, अशी माहितीही मिळाली आहे. परंतु Netflix अ‍ॅपवर मात्र ते गेम्स हटवले गेल्यावर दिसणार नाहीत. त्यामुळे जे युजर्स अद्याप हे गेम्स खेळलेले नाहीत, त्यांच्यासाठी 14 जुलैपर्यंतची ही अंतिम संधी आहे.

मोठ्या बदलांच्या दृष्टीने Netflix चा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून तो गेमिंग मार्केटमध्ये त्यांच्या भविष्यातील भुमिकेचे संकेत देतो. गेमिंग प्रेमींसाठी हे शेवटचे काही दिवस आनंदाने खेळून घेण्याची वेळ आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed