PCMC: ताथवडे एलिमेंटा सोसायटीत १४ तास वीजपुरवठा खंडित, जनरेटरवर १.२५ लाखांचा नाहक खर्च

0
PCMC: ताथवडे एलिमेंटा सोसायटीत १४ तास वीजपुरवठा खंडित, जनरेटरवर १.२५ लाखांचा नाहक खर्च

PCMC: ताथवडे एलिमेंटा सोसायटीत १४ तास वीजपुरवठा खंडित, जनरेटरवर १.२५ लाखांचा नाहक खर्च

ताथवडेतील एलिमेंटा फेज-१ सोसायटीत १४ तास वीजपुरवठा खंडित झाला. रहिवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागली, जनरेटरवर सव्वा लाखांचा खर्च, महावितरणकडून अधिकृत माहिती अद्याप नाही.


सायली मेमाणे

पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : पुणे (ताथवडे) – ताथवडे परिसरातील एलिमेंटा फेज-१ सोसायटीतील रहिवाशांना बुधवारी १४ तास वीजपुरवठा खंडित होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या वीजविच्छेदामुळे ९०० हून अधिक सदनिकाधारकांना वीजेशिवाय राहावे लागले. यामुळे सोसायटीला जनरेटरवर सव्वा लाखांचा नाहक खर्च करावा लागला, तर रहिवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली.

सकाळी ६ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुपारी काही काळासाठी वीज पुरवठा सुरू झाला, परंतु सायंकाळी ५ वाजता पुन्हा बंद झाला. दुसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्यास यश मिळवले.

सोसायटीत १४ तास वीज नसल्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान, ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नागरिकांना कार्यालयात जाऊन काम करावे लागले, तर वयोवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

एलिमेंटा फेज-१ सोसायटीचे सचिव प्रवीण फरद म्हणाले, “महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. १४ तासांच्या वीजबंदीमुळे सोसायटीने आपत्कालीन सेवा चालवण्यासाठी १.२५ लाखांचा अतिरिक्त खर्च केला. ही नुकसान भरपाई महावितरणकडून मिळेल का? असा आमचा प्रश्न आहे.”

वाकड पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनचे संस्थापक सचिन लोंढे यांनी सांगितले, “वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणने नागरिकांना तातडीने माहिती द्यावी, त्रास टाळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी.”

महावितरणचे अभियंता गुरु वाघमारे यांनी सांगितले, “ताथवडे सब स्टेशनवर येणा-या मेन लाईनमध्ये बिघाड झाला होता. काम गुरुवारी पहाटे पर्यंत पूर्ण केले असून, वीजपुरवठा आता सुरळीत सुरु आहे. काही सोसायटींमध्ये वेळोवेळी १ ते ३ तास वीज बंद ठेवण्यात आले होते.”

तथापि, रहिवाशांचा आरोप आहे की, महावितरणकडून नियमित देखभाल व तपासणी न केल्यामुळे वीजपुरवठा सलग बंद होत आहे. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed