Phaltan Doctor Death Case : महिला डॉक्टर प्रकरणात मोठी कारवाई! PSI गोपाळ बदनेला पोलीस सेवेतून बडतर्फ

0
महिला डॉक्टर प्रकरणात मोठी कारवाई! PSI गोपाळ बदनेला पोलीस सेवेतून बडतर्फ

महिला डॉक्टर प्रकरणात मोठी कारवाई! PSI गोपाळ बदनेला पोलीस सेवेतून बडतर्फ

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. मृत डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये बदनेचे नाव नमूद करण्यात आले होते. या प्रकरणामुळे पोलीस दलावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सायली मेमाणे

५ ऑक्टोबर २०२५ : सातारा : राज्यात चर्चेत असलेल्या फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली असून, बदनेने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ही घटना बीड जिल्ह्यातील असून, मृत महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती. डॉक्टरने तिच्या हातावर स्पष्टपणे लिहिले होते की, “माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाळ बदने जबाबदार आहे. त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला.” या सुसाईड नोटमुळे बदनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला आधी निलंबित करण्यात आले होते.

पण या प्रकरणातील प्राथमिक चौकशीत गंभीर तथ्ये समोर आल्यानंतर पोलिस महासंचालनालयाने त्याच्यावर आणखी कठोर पावले उचलली आहेत. सध्या गोपाळ बदने न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. बदनेने पोलीस दलाची प्रतिष्ठा कमी केली असल्याचे नमूद करून त्याला सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणातील तपासादरम्यान बदनेचे इतरही धक्कादायक कारनामे उघड झाले आहेत. स्थानिक महिलांशी अश्लील वर्तन, छेडछाड, आणि धमक्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही महिलांनी सांगितले की, बदने वारंवार त्यांना त्रास देत असे, त्यांच्याकडे पाहून डोळा मारणे आणि अपमानास्पद वर्तन करणे ही त्याची सवय होती. या वागणुकीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आधीपासूनच काही तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे.

गोपाळ बदने हा गेल्या दोन वर्षांपासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. याआधी तो बरड पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी असून विवाहित आहे. पोलिसांमध्ये कार्यरत असतानाच त्याच्यावर वर्तणुकीबाबत अनेकदा शिस्तभंगाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्या वेळी मोठी कारवाई करण्यात आली नव्हती.

या प्रकरणात दुसरा आरोपी प्रशांत बनकर याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला डॉक्टरने तिच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते की, “प्रशांत बनकर गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहे.” या आरोपांनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 376 (अ), 306, 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्र पोलिस दलावर पुन्हा एकदा नैतिकता आणि जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याकडून अशा प्रकारे गुन्हेगारी वर्तन झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. राज्यातील महिला डॉक्टर संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले की, “पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला माफ केले जाणार नाही. अशा घटकांविरुद्ध कठोर कारवाईचाच मार्ग अवलंबला जाईल.”

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed