PMC Election 2026: सूस गावात लहू बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची भव्य पदयात्रा; प्रभाग ०९ मध्ये वाढता जनसमर्थन

PMC Election 2026: सूस गावात लहू बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची भव्य पदयात्रा; प्रभाग ०९ मध्ये वाढता जनसमर्थन
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूस गावात लहू बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या भव्य पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपला वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
पुणे १३ जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूस गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळणारा वाढता जनसमर्थन चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचा सहभाग आणि प्रतिसाद पाहता भाजपच्या बाजूने जनमत झुकत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
भगवती नगर येथून सुरू झालेली भाजपची पदयात्रा भैरवनाथ मंदिर येथे समारोपाला पोहोचली. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण, औक्षण आणि जोरदार घोषणांच्या गजरात भाजप उमेदवारांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिक स्वतःहून पदयात्रेत सहभागी झाले. हा प्रतिसाद केवळ औपचारिक स्वागतापुरता मर्यादित न राहता, सूस गावाच्या विकासासाठी भाजपच योग्य पर्याय असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत असल्याचे निदर्शक ठरला.
या पदयात्रेत भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. रोहिणीताई चिमटे, श्री. गणेश कळमकर, सौ. मयुरीताई कोकाटे आणि श्री. लहू बालवडकर सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले आशीर्वाद, महिलांनी व्यक्त केलेला विश्वास आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग यामुळे भाजपचा प्रचार अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले.
भाजपकडून ही निवडणूक सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असल्याची भूमिका ठामपणे मांडण्यात आली. सूस गाव आणि प्रभाग क्रमांक ०९ च्या सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षांचा स्पष्ट आणि नियोजनबद्ध आराखडा नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स तसेच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे उमेदवारांकडून सांगण्यात आले.
यावेळी भाजप नेते लहू बालवडकर यांनी नागरिकांना संबोधित करताना, “ही निवडणूक सत्तेसाठी नाही, तर सेवेसाठी आहे. मला सेवा करण्याची संधी द्या. पुढील पाच वर्षे आपल्या प्रभागाच्या विकासाची असतील. भाजप शब्दांवर नाही तर कामावर विश्वास ठेवते,” असे ठामपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेला उपस्थित नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
या भव्य पदयात्रेनंतर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपला मिळणारा जनतेचा ठाम पाठिंबा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सूस गावात उमेदवारांविषयी असलेला विश्वास, विकासाबाबतच्या अपेक्षा आणि पदयात्रेदरम्यान दिसलेला उत्साह पाहता, या प्रभागात भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare