प्रभाग ११ रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगरमध्ये जनसंपर्क वाढतोय; अभिजित भागवत राऊत यांच्या कार्याची नागरिकांत चर्चा

0
प्रभाग ११ रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगरमध्ये जनसंपर्क वाढतोय; अभिजित भागवत राऊत यांच्या कार्याची नागरिकांत चर्चा

प्रभाग ११ रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगरमध्ये जनसंपर्क वाढतोय; अभिजित भागवत राऊत यांच्या कार्याची नागरिकांत चर्चा

प्रभाग ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगर) मध्ये सामाजिक कार्य, पायाभूत सुविधा आणि आरोग्य योजनांसाठी अभिजित भागवत राऊत यांचे प्रयत्न लक्षवेधी ठरत आहेत.

पुणे ९ जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगर) या परिसरात सामाजिक व विकासात्मक कामांमुळे अभिजित भागवत राऊत हे नाव नागरिकांमध्ये परिचित ठरत आहे. याच परिसरात वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क असून, स्थानिक प्रश्नांची जाण त्यांना जवळून आहे.

सामान्य नागरिकातून सामाजिक कार्यकर्त्यापर्यंतचा प्रवास

कोणताही राजकीय वारसा नसतानाही अभिजित राऊत यांनी शालेय जीवनापासून समाजकारणाची आवड जोपासली. सार्वजनिक उपक्रम, उत्सवांचे आयोजन आणि नागरिकांच्या अडचणींमध्ये पुढाकार घेणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. “समाजासाठी काम करताना सत्तेपेक्षा विश्वास अधिक महत्त्वाचा” ही भूमिका ते सातत्याने मांडत आले आहेत.

भाजपच्या माध्यमातून सक्रिय सामाजिक सहभाग

सन 2007 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते समाजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रीय नेतृत्व, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीकोनातून प्रेरणा घेत नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करत असल्याचे ते सांगतात. राजगड, भोर आणि मुळशी परिसराशी जोडलेली ओळख आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अनुभव ही त्यांच्या कामाची शिदोरी ठरली आहे.

विकासकामांमधील ठोस योगदान

गेल्या 3–4 वर्षांत प्रभाग के. 38 (जुना) मधील राजीव गांधी नगर तसेच आण्णाभाऊ साठे नगर, कृष्णानगर, झांबरे वस्ती, सिद्धार्थ नगर आणि चैत्रवन वसाहत या भागांत ड्रेनेज आणि रस्ते विकासाची सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव (आण्णा) तापकीर यांच्या विकास निधीतून ही कामे मार्गी लागल्याने नागरिकांच्या दैनंदिन अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते.

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात

सुतारदऱ्या परिसरातील दत्तनगर व क्रांतिसेना भागात ड्रेनेज आणि पथदिव्यांच्या तक्रारी समोर आल्यानंतर अभिजित राऊत यांनी तातडीने भेट देऊन प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आवश्यक असल्यास स्वतः पुढाकार घेऊन समस्या सोडवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ‘आयुष्यमान भारत’ कार्ड वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करून सुमारे 2000 लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचा लाभ मिळवून देण्यात आला. कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

आगामी निवडणुकीकडे लक्ष

येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगर) मधून नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा अभिजित भागवत राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत स्थानिक राजकारणात त्यांच्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *