पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश 4 बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

0
पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश 4 बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

पुण्यातील बुधवार पेठेत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश 4 बांगलादेशी महिलांची सुटका, एक आरोपी अटकेत

पुण्यातील बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांची मोठी कारवाई. नोकरीचे आमिष दाखवून देहविक्रीत ढकललेल्या 4 बांगलादेशी महिलांची सुटका; एक आरोपी अटकेत, मानवी तस्करीचा संशय.


पुणे ०७ मार्च २०२६ : पुणे शहरातील कुप्रसिद्ध बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई करत भांडाफोड केला आहे. नोकरीचे आमिष दाखवून परदेशातून महिलांना भारतात आणून त्यांना जबरदस्तीने देहविक्रीत ढकलले जात असल्याचे या कारवाईत उघड झाले आहे.

या प्रकरणात फरासखाना पोलिसांनी चार बांगलादेशी महिलांची सुटका केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेत बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर फरासखाना पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई डीसीपी झोन 1 क्रुषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बांगलादेशातील चार महिला आणि एक पुरुष आढळून आले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी या महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणल्याचे समोर आले.

मात्र भारतात आल्यानंतर या महिलांना धमकावून आणि पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकारामुळे मानवी तस्करीचे गंभीर स्वरूप समोर आले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी भोपसिंग राजपूत या आरोपीला बुधवार पेठ परिसरातून ताब्यात घेतले आहे. तसेच बाबू भैय्या उर्फ पापा शेख, मुल्ला नावाचा बांगलादेशी एजंट आणि मीनाक्षी रमेश मेट्री या घरमालकिणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमे तसेच इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट 1956 अंतर्गत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 71/2026 नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असला तरी या मागे आणखी मोठे मानवी तस्करीचे जाळे कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या चारही महिलांना पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्याचे कामही पोलिसांनी सुरू केले आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्रीच्या रॅकेटवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed