Pune Crime: 73 वर्षीय म्हाताऱ्याने रिसेप्शनिस्ट तरुणीचा केला विनयभंग, विकृत बोलण्याने संताप

0
: 73 वर्षीय म्हाताऱ्याने रिसेप्शनिस्ट तरुणीचा केला विनयभंग, विकृत बोलण्याने संताप

: 73 वर्षीय म्हाताऱ्याने रिसेप्शनिस्ट तरुणीचा केला विनयभंग, विकृत बोलण्याने संताप

Pune Crime News: पुण्यात 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया या वृद्धाने 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केला. ‘मला पप्पी दे’ अशी विकृत मागणी करत हॉटेल आणि पैशांचे आमिष दाखवत केले अश्लील वर्तन. आरोपी अटकेत.

सायली मेमाणे

पुणे ७ जुलै २०२५ : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये ३ जुलै रोजी २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा ७३ वर्षीय म्हाताऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. आरोपीचं नाव सुरेशचंद चोरडिया असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्लिनिकमध्ये त्या दिवशी ही तरुणी एकटी होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अश्लील भाषेत बोलणे, स्पर्श करणे आणि विकृत मागण्या करणे सुरू केले. ‘मला पप्पी दे’ अशी विकृत मागणी करत त्याने तिच्या गालाला हात लावला. इतक्यावरच न थांबता त्याने खिशाकडे हात दाखवत ‘माझ्याकडे खूप पैसे आहेत, तुला हॉटेलला जेवायला नेतो, हवं ते देतो पण माझ्या मनात जे आहे ते कर’ असे अश्लील बोलणे सुरू ठेवले.

या सगळ्या प्रकाराने घाबरलेली तरुणी लगेचच क्लिनिकच्या बाहेर पळाली. मात्र, विकृत वृत्तीचा म्हातारा तिच्या मागे पळाला आणि ‘उद्या तू क्लिनिकमध्ये आहेस ना?’ असे विचारून तिच्या मनोबलावर आणखी आघात केला. या संतापजनक घटनेनंतर तरुणीने थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले आणि या वृद्धाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुरेशचंद चोरडिया याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अश्लील वागणुकीच्या घटना सतत वाढत आहेत. अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी सध्या सर्वत्र होत आहे. पोलिसांनी अशा विकृत वृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *