Pune Crime News : मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांचे खाजगी क्षण चोरून बघणाऱ्या भोंदूबाबाला पुण्यात अटक

0
मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांचे खाजगी क्षण चोरून बघणाऱ्या भोंदूबाबाला पुण्यात अटक

मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांचे खाजगी क्षण चोरून बघणाऱ्या भोंदूबाबाला पुण्यात अटक

पुण्यात बावधन पोलिसांनी दिव्यशक्तीच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली. मोबाईल अ‍ॅपद्वारे खासगी क्षणांवर नजर, वेश्यागमनास भाग पाडल्याचा आरोप.

सायली मेमाणे

पुणे २८ जून २०२५ : पुण्यात बावधन परिसरातून एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. स्वयंघोषित ‘दिव्यशक्ती’धारक भोंदूबाबाने भक्तांच्या खाजगी आयुष्यावर हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय 29, रा. पुणे) या बाबाला अटक केली आहे. आरोपी बाबाने स्वतःकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करत अनेक भक्तांची दिशाभूल केली. एका 39 वर्षीय व्यक्तीच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तामदार याने फिर्यादी व्यक्तीच्या मोबाईलमध्ये गुप्तरीत्या एक ‘हिडन अ‍ॅप’ डाऊनलोड करून त्याचा मोबाईल ऍक्सेस मिळवला. त्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, खासगी क्षण, अगदी अश्लील कृती आणि वेश्यागमनाचे प्रसंगही त्या अ‍ॅपद्वारे थेट पाहून त्याचे चित्रीकरण केले. केवळ एवढ्यावरच न थांबता, तामदारने त्या भक्ताला अशा कृती करण्यास भाग पाडले आणि नंतर त्यावर ब्लॅकमेल करत मानसिक त्रास दिला. आरोपीने या सगळ्याच्या बदल्यात वेळोवेळी आर्थिक लाभ घेतला असल्याचेही उघड झाले आहे.

फिर्यादीने ही माहिती थेट बावधन पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. सायबर गुन्हे शाखेच्या तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल आणि वापरलेल्या अ‍ॅपचा सखोल तपास करण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल डेटा, व्हिडिओ क्लिप्स आणि अ‍ॅपच्या लॉग्स जप्त करून डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे. तपासात अशीही माहिती समोर आली आहे की, या बाबाने केवळ फिर्यादीच नव्हे तर इतर अनेक व्यक्तींना याच पद्धतीने अडकवले होते.

पोलीस सध्या आरोपीने चित्रीकरण केलेल्या फाइल्स नेमक्या कुठे साठवल्या, त्या क्लाऊडवर आहेत की लोकल स्टोरेजवर, याचा शोध घेत आहेत. त्यामुळे आरोपीच्या नेटवर्कचा विस्तार तपासण्यासाठी त्याचे कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि अन्य सहकाऱ्यांचाही तपास सुरू आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी नागरिकांना अशा व्यक्तींविषयी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणीही आपल्या मोबाइलमध्ये अज्ञात अ‍ॅप्स डाऊनलोड करत असल्यास, वा कोणीतरी मानसिक दबाव टाकत असेल तर त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणासोबतच पुण्यात आज २८ जून रोजी पहाटे सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड झाली आहे. अज्ञात टोळक्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी १७ गाड्यांचे नुकसान केले असून, हे कृत्य दारूच्या नशेत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून टोळक्याचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणांमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed