Pune Ganeshotsav 2025: दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा; गणेश भक्तांना सुरक्षा कवच
Pune Ganeshotsav 2025: गणेश भक्तांसाठी सुरक्षा कवच! दगडूशेठ मंडळाकडून 50 कोटींचा विमा
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून ५० कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला किंवा अपघात झाल्यास गणेश भक्तांना विमा संरक्षण मिळणार आहे.
सायली मेमाणे
पुणे २५ ऑगस्ट २०२५ : पुणे : लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अगदी काही दिवसांवर आला आहे. राज्यभरात गणेश भक्त उत्सुकतेने तयारी करत असताना, पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.
हा निर्णय गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. या विम्यामुळे चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास भक्तांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
- अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये प्रति व्यक्ती
- अपघातात अंशतः अपंगत्व आल्यास २ लाख रुपये
- अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च
ही सुविधा उत्सव काळात सर्व गणेश भक्तांसाठी लागू असेल.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनीही मोठे नियोजन केले आहे.
- मध्यवर्ती भागात CCTV बसवणे,
- वीज व रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती,
- गर्दी नियंत्रणासाठी ११ विशेष पोलिस पथके
पोलिसांकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे काढून पुणे महापालिकेला पाठवली जात आहेत. त्यानुसार महापालिकेकडून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती सुरु झाली आहे.
दगडूशेठ गणपती मंडळाचा ५० कोटींचा विमा आणि पुणे पोलिसांचे नियोजन या वर्षीचा गणेशोत्सव भक्तांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करणार आहे. पुणेकरांसाठी हा उपक्रम एक नवा आदर्श ठरणार आहे.