Pune Grand Tour 2026: पुणे ग्रॅंड टूरमध्ये 70 वर्षीय आजोबांचा जलवा; व्हिडिओ व्हायरल
Pune Grand Tour 2026: पुणे ग्रॅंड टूरमध्ये 70 वर्षीय आजोबांचा जलवा; व्हिडिओ व्हायरल
पुणे ग्रॅंड टूर 2026 मध्ये 70 वर्षांच्या आजोबांनी सायकलिंग करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे २१ जानेवारी २०२६ : पुणे शहरात 19 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर 2026 मध्ये अनेक रोमहर्षक क्षण पाहायला मिळत आहेत. जगभरातील नामवंत सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले असताना, एका अनोख्या सायकलपट्टूने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा सायकलपटू वयाने 20 किंवा 25 वर्षांचा तरुण नसून तब्बल 70 वर्षांचा आहे. त्याच्या उत्साहाने, आत्मविश्वासाने आणि फिटनेसमुळे पुणेकरांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
या स्पर्धेत तब्बल 35 देशांतील 171 हून अधिक आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी सहभाग घेतला आहे. पहिल्या टप्प्यात गुडलक चौक ते सभांजी चौक असा मार्ग होता, तर दुसऱ्या टप्प्यात हिंजेवाडी परिसरात सायकलिंग स्पर्धा पार पडत आहे. याच दुसऱ्या टप्प्यात एका 70 वर्षीय सायकलपट्टूने तरुणांना लाजवेल असा परफॉर्मन्स करत प्रेक्षकांची मने जिंकली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या आजोबांचे स्वागत केले.
सोशल मीडियावर सध्या या आजोबांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पांढरे केस, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि सायकलवरचा अचूक ताबा पाहून अनेकांनी त्यांना ‘खरा तरुण’ अशी उपमा दिली आहे. वय म्हणजे फक्त एक आकडा असतो, हे या आजोबांनी कृतीतून दाखवून दिले आहे. अनेक तरुण सायकलपटूंनाही त्यांनी वेग आणि सातत्याने मागे टाकल्याचे पाहायला मिळाले.
पुणे ग्रॅंड टूरसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे शहराचा नावलौकिक वाढत असून, खेळ आणि फिटनेस संस्कृतीला चालना मिळत आहे. या स्पर्धेचा उद्देश केवळ विजेते ठरवणे नाही, तर आरोग्य, पर्यावरणपूरक वाहतूक आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देणे हा देखील आहे. अशा पार्श्वभूमीवर 70 वर्षीय सायकलपट्टूचा सहभाग आणि त्यांची कामगिरी या संदेशाला अधिक बळ देणारी ठरली आहे.
हिंजेवाडी परिसरात झालेल्या या सायकलिंगदरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. काही क्षणांतच हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आणि पाहता पाहता ते व्हायरल झाले. “आजोबा असतील तर असे”, “खरा फिटनेस आयकॉन” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
या घटनेमुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून, वयाची मर्यादा न मानता नियमित व्यायाम आणि खेळाकडे वळावे, असा संदेश समाजात पोहोचत आहे. पुणे ग्रॅंड टूर 2026 मधील हा क्षण केवळ एक व्हायरल व्हिडिओ नसून, तो सकारात्मक ऊर्जेचा आणि जिद्दीचा प्रतीक ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information