Pune Politics: काँग्रेसला तिसरा झटका, फडणवीसांच्या हुकमी एक्क्याने संजय जगताप भाजपमध्ये; पुरंदरहून मोठा मासा गळाला

0
काँग्रेसला तिसरा झटका, फडणवीसांच्या हुकमी एक्क्याने संजय जगताप भाजपमध्ये

काँग्रेसला तिसरा झटका, फडणवीसांच्या हुकमी एक्क्याने संजय जगताप भाजपमध्ये

काँग्रेसला तिसरा मोठा धक्का; पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप १६ जुलैला भाजपमध्ये होणार प्रवेश, कार्यकर्त्यांचा दबाव आणि निवडणुका कारणीभूत.

सायली मेमाणे

पुणे १२ july २०२५ : पुणे – पुणे जिल्हा काँग्रेससाठी सलग तिसऱ्यांदा धक्कादायक घडामोडी घडत आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे यांच्या नंतर आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनीदेखील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १६ जुलै रोजी संजय जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

संजय जगताप यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नेतृत्व दाखवले नव्हते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना सासवड आणि जेजुरीसारख्या भागांमध्ये भाजपशिवाय पर्याय नाही, असा कार्यकर्त्यांचा सूर असल्यामुळे जगताप यांच्यावर पक्ष बदलण्यासाठी दबाव वाढत होता.

भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय केवळ निवडणूक रणनीतीपुरता मर्यादित नसून, संजय जगताप यांचे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले वैयक्तिक घनिष्ठ संबंध, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक हेही या निर्णयामागचे महत्त्वाचे घटक आहेत. २०१९ च्या निवडणुकीत RSS कडून मिळालेला आधार यावेळीही त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप प्रवेशाचा सोहळा मुंबईत की सासवडमध्ये मोठ्या मेळाव्यात होणार यावर अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार हे निश्चित आहे.

काँग्रेसच्या शिबिरात यामुळे अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. संग्राम थोपटे यांनी पक्ष सोडल्यानंतर संजय जगताप यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ होते. काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दिशेने पाहत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील संजय जगताप आणि अजित पवार यांच्यातील दरीमुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची शक्यता स्वतः जगताप यांनी नाकारली.

भाजपला ही घरबसल्या मोठी भर मिळाली आहे. पुरंदर-हवेली मतदारसंघात विजय शिवतारे यांना शह देण्यासाठी आणि मतदारसंघ स्वतःकडे खेचण्यासाठी संजय जगताप यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यांच्याकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मोठे जाळे, युवकांची ताकद आणि सामाजिक संस्थांमधील सक्रिय सहभाग असल्यामुळे भाजपसाठी ही मोठी निवडणूक तयारीची चाल ठरू शकते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed