पुणे ग्रामीण पोलीस यशस्वी: घोटावडे गावात मृतदेहाची ओळख पटवून खून करणाऱ्या आरोपीस अटक

0
पुणे ग्रामीण पोलीस यशस्वी: घोटावडे गावात मृतदेहाची ओळख पटवून खून करणाऱ्या आरोपीस अटक

पुणे ग्रामीण पोलीस यशस्वी: घोटावडे गावात मृतदेहाची ओळख पटवून खून करणाऱ्या आरोपीस अटक

पुणे ग्रामीण पोलीसांनी पौड पोलीस स्टेशनच्या कारवाईत, घोटावडे गावात टाकलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख करून खून करणाऱ्या आरोपी सचिन प्रकाश जाधव यास अटक केली.

सायली मेमाणे

पुणे २७ सप्टेंबर २०२५ : पुणे ग्रामीण: पुणे ग्रामीण पोलीस आणि पौड पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत, घोटावडे गावात टाकलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खून करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात यश मिळाले आहे. या प्रकरणातील मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जावून फेकलेला होता. प्राथमिक तपासानुसार मृतदेहावर गळयावर वार आणि डोक्यात जखमा होत्या, ज्यावरून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

सदर प्रकरणी पौड पोलीस स्टेशन गुन्हा नं. २५२/२०२५ भा.न्या.सं.क १०३(१), २३८ नुसार १३ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व पौड पोलीस स्टेशनच्या पथकांनी एकत्रित सुरू केला. घटनास्थळावर आधार कार्ड मिळाल्यामुळे मृतदेहाची ओळख आशुतोष मनोहर वैशंपायन (वय ४७) असे करण्यात आली. तपासात समजले की, ते ४ सप्टेंबर २०२५ रोजी लखनऊहून पुण्यात आले होते.

पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मृतदेहाचे कपडे व आशुतोष वैशंपायन यांचे कपडे जुळल्यामुळे त्यांचा मागोवा घेतला. त्याचे स्वारगेटहून सिंहगड रोडकडे जाणारे प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.

गोपनीय माहितीच्या आधारे रिक्षा चालक सचिन प्रकाश जाधव (वय ४१) यास शोधून २० सप्टेंबर २०२५ रोजी धनकवडी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने कबुल केले की, आशुतोष वैशंपायन यांचे बँक खात्यात मोठी रक्कम असल्याचे समजल्यामुळे त्याने लोभापायी खून करून मृतदेह घोटावडे गावेत टाकला.

सचिन जाधव यास पुणे न्यायालयात हजर केले असता, २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, सचिन जाधव हा सराईत गुन्हेगार असून पुणे शहरात त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरीसह एकूण १३ गुन्हे नोंदवले गेले आहेत.

या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, राजू मोमीण, दिलीप सुपे आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पौड पोलीस स्टेशन करत आहे, ज्यामध्ये आरोपीची आर्थिक हालचाल, खूनासाठी मदत घेतलेली व्यक्ती व अन्य घटनांचा शोध घेतला जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *