पुणे: स्थायी समिती अध्यक्षपदी; ‘भीमाले – टिंगरे’ की, तिसरंच कोणी?

0
पुणे: स्थायी समिती अध्यक्षपदी; 'भीमाले - टिंगरे' की, तिसरंच कोणी?

पुणे: स्थायी समिती अध्यक्षपदी; 'भीमाले - टिंगरे' की, तिसरंच कोणी?

पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चुरस वाढली असून श्रीनाथ भिमाले, बॉबी टिंगरे यांच्यासह तिसऱ्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

पुणे ०७ जानेवारी २०२६ : पुणे महानगरपालिका निवडणुकीत ११९ जागांसह ऐतिहासिक बहुमत मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने आता सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची नावे जवळपास निश्चित झाल्याने महापालिकेचे नेतृत्व स्पष्ट झाले असले, तरी आर्थिक नाड्या हाताळणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्येच मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

पुण्याच्या तिजोरीवर कोणाचे नियंत्रण?
पुणे महापालिकेतील सर्व महत्त्वाचे आर्थिक निर्णय आणि विकासकामांच्या निविदा स्थायी समितीमार्फत मंजूर केल्या जातात. त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि बॉबी उर्फ अनिल टिंगरे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विकासाचे आव्हान आणि आश्वासनांची पूर्तता
प्रशासक राजवट संपल्यानंतर आता पुण्याच्या विकासाला गती देण्याची संपूर्ण जबाबदारी भाजपवर आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना दिलेल्या आश्वासनांची, प्रामुख्याने वाहतूक कोंडी, नवीन रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची अंमलबजावणी या नव्या कारभाऱ्यांना करावी लागणार आहे.

गटनेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती करून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होतो, यावर आगामी काळातील पुणे शहराच्या विकासाची आणि महापालिकेच्या आर्थिक धोरणांची दिशा अवलंबून असणार आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *