Republic Day 2026: भारताचा 77वा की 78वा प्रजासत्ताक दिन? नेमकं उत्तर जाणून घ्या

0
Republic Day 2026: भारताचा 77वा की 78वा प्रजासत्ताक दिन? नेमकं उत्तर जाणून घ्या

Republic Day 2026: भारताचा 77वा की 78वा प्रजासत्ताक दिन? नेमकं उत्तर जाणून घ्या


Republic Day 2026 मध्ये भारत 77वा की 78वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय? 26 जानेवारी 1950 पासूनचे अचूक गणित, इतिहास आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सविस्तर जाणून घ्या.


पुणे 2५ जानेवारी २०२६ : दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने साजरा केला जातो. या दिवशी देशभरात भव्य संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. मात्र दरवर्षी एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो तो म्हणजे यंदा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे? 2026 मध्ये आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय की 78वा, याबाबत अनेकदा सोशल मीडियावरही संभ्रम पाहायला मिळतो. त्यामुळे याबाबतची अचूक माहिती समजून घेणे गरजेचे ठरते.

भारत 26 जानेवारी 1950 रोजी पूर्णतः प्रजासत्ताक देश झाला. याच दिवशी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारताने स्वतःची लोकशाही शासनव्यवस्था अधिकृतपणे स्वीकारली. संविधान लागू झाल्यानंतर देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि कायदेशीर संरक्षण मिळाले. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर भारत स्वतंत्र झाला असला तरी 1950 मध्ये संविधान लागू झाल्याने भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला, म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक मानला जातो.

पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी सलग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाची मोजणी 1950 पासून केली जाते, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकजण सरळ वर्षांची संख्या धरून गोंधळ करतात, पण प्रजासत्ताक दिनाची गणना पहिल्या साजऱ्या दिवसापासूनच होते.

जर आपण गणित पाहिले तर 26 जानेवारी 1950 हा पहिला प्रजासत्ताक दिवस ठरतो. 1951 मध्ये दुसरा, 1959 मध्ये दहावा, 2025 मध्ये 76वा आणि त्यानंतर 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे 2026 मध्ये 78वा नव्हे तर 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, हे स्पष्ट होते.

प्रजासत्ताक दिन हा केवळ सुट्टीचा किंवा औपचारिक कार्यक्रमांचा दिवस नाही, तर तो भारतीय लोकशाहीची ताकद, संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांच्या अधिकारांची आठवण करून देणारा दिवस आहे. दिल्लीतील कर्तव्य पथावर होणारे भव्य संचलन, संरक्षण दलांची ताकद, विविध राज्यांचे चित्ररथ आणि सांस्कृतिक विविधता दाखवणारे कार्यक्रम देशाच्या एकतेचे प्रतीक मानले जातात.

यंदा राज्याच्या वतीने सादर होणाऱ्या चित्ररथाची संकल्पना ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ अशी आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, स्वावलंबन आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या गौरवशाली इतिहासासोबतच उज्ज्वल भविष्याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे 2026 मध्ये भारत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, हीच अचूक आणि अधिकृत माहिती आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *