Ritu Tawde Mumbai Mayor Candidate : मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडे कोण आहेत? शिक्षण, संपत्ती आणि राजकीय प्रवास
Ritu Tawde Mumbai Mayor Candidate : मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडे कोण आहेत? शिक्षण, संपत्ती आणि राजकीय प्रवास
BMC Election 2026: भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांचे शिक्षण किती आहे? त्यांच्या कुटुंबाकडे किती संपत्ती आणि कर्ज आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
पुणे ०७ जानेवारी २०२६ :मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी हालचालींना वेग आला असून भाजपकडून रितू तावडे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून संजय घाडी यांनी अर्ज दाखल केला आहे. मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ पाहता महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने रितू तावडे यांचे नाव चर्चेत आले आहे.
रितू तावडे या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक असून त्या यापूर्वीही दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2012 साली त्यांनी प्रभाग क्रमांक 121 मधून प्रथमच नगरसेविका म्हणून विजय मिळवला होता. त्यानंतर 2025 साली प्रभाग क्रमांक 132 मधून त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या. स्थानिक पातळीवर संघटनात्मक काम, जनसंपर्क आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळे त्या भाजपमध्ये विश्वासार्ह चेहरा मानल्या जातात.
रितू तावडे यांच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी 1993 साली आचार्य मराठे कॉलेजमधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या मुंबईतील विद्याविहार परिसरातील रहिवासी असून व्यवसायाने त्या व्यापार क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे.
रितू तावडे यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबाबतही प्रतिज्ञापत्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तावडे कुटुंबाकडे एकूण 5 कोटी 26 लाख 67 हजार 417 रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये 2 कोटी 82 लाख 42 हजार 417 रुपयांची जंगम मालमत्ता असून 2 कोटी 44 लाख 25 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
मात्र, मालमत्तेसोबतच कर्जाचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तावडे कुटुंबावर सार्वजनिक आणि शासकीय वित्तीय संस्थांचे मिळून एकूण 3 कोटी 2 लाख 11 हजार 958 रुपयांचे कर्ज आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुमारे 14 लाख 71 हजार 870 रुपये इतके असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात त्या मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information