School News: राज्यातील 700 मराठी शाळांना दिलासा; पटसंख्या निकष शिथील करण्याची तयारी, अतिरिक्त शिक्षकांवरील निर्णय लवकरच

0
School News: राज्यातील 700 मराठी शाळांना दिलासा; पटसंख्या निकष शिथील करण्याची तयारी, अतिरिक्त शिक्षकांवरील निर्णय लवकरच

School News: राज्यातील 700 मराठी शाळांना दिलासा; पटसंख्या निकष शिथील करण्याची तयारी, अतिरिक्त शिक्षकांवरील निर्णय लवकरच

राज्यातील 700 मराठी शाळा बंद होण्याचा धोका टळणार; पटसंख्या निकष शिथील करण्याचा सरकारचा विचार, शिक्षकांचे समायोजन निर्णय डिसेंबरअखेर अपेक्षित.


पुणे ९ डिसेंबर २०२५ : राज्यातील हजारो शिक्षक आणि शेकडो मराठी शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील सुमारे 700 मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असताना आता शासन या निकषात शिथिलता आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या शाळा बंद पडल्यास 25 हजारांहून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापना कडून सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पटसंख्येच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या दिशेने शासनाने हालचाली सुरू केल्याचा संकेत मिळत आहेत.

माहितीनुसार, 2025–26 या शैक्षणिक वर्षासाठी संचमान्यता प्रक्रियेचे काम डिसेंबरअखेर अंतिम टप्प्यात येईल. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका शाळांची पटसंख्या सर्वप्रथम 20 डिसेंबरपर्यंत निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची पटसंख्या पुढील दहा दिवसांत पूर्ण होईल. संचमान्यतेनुसार राज्यभरात ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त असेल, त्यांचे समायोजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. सुरुवातीला त्याच शाळेत, त्यानंतर तालुक्यात, जिल्ह्यात आणि शेवटी गरज पडल्यास राज्यातील इतर शाळांमध्ये या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल असे समजते.

सध्या नववी आणि दहावीतील ज्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी आहे, अशा वर्गांतील शिक्षक अतिरिक्त घोषित होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र शिक्षकांकडून या नियमाविरोधात मोठा विरोध होत आहे. मार्च 2024 च्या संचमान्यतेसंबंधी शासन निर्णयानंतर शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आता या पार्श्वभूमीवर सरकार निर्णयात बदल करण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, समायोजनाची अंतिम प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शासनाकडून नवीन निर्णय येण्याची शक्यता असून डिसेंबरअखेर याबाबतचा अधिकृत आदेश जारी होऊ शकतो.

दरम्यान, 2024–25 च्या संचमान्यतेनुसार करण्यात येणारा समायोजनाचा शासन निर्णय मागे घेतला आहे. आता 2025–26 ची संचमान्यता पूर्ण झाल्यावरच समायोजनावर अंतिम निर्णय होणार आहे. यासंबंधी बोलताना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले की, संचमान्यासाठी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या निकषात बदल करण्याचा प्रस्ताव शासनाला पूर्वीच पाठवला असून त्यावर काम सुरू आहे. शिक्षक संघटनांकडून मिळालेली प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांचे हित आणि ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता या निकषात शिथीलता देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

शालेय शिक्षणाच्या पायाभूत रचनेवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असल्याने याकडे राज्यातील शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे विशेष लक्ष आहे. अनेक ग्रामीण व आदिवासी भागांतील शाळांमध्येगेल्या काही वर्षांत पटसंख्या घटली असली तरी त्या भागातील विद्यार्थ्यांसाठी या शाळाच एकमेव शिक्षण केंद्र आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताविरोधात जाईल, अशी भूमिका शिक्षक, पालक आणि स्थानिक प्रतिनिधींनी ठामपणे मांडली आहे.

आता सरकार पटसंख्येच्या नियमांमध्ये कितपत शिथीलता देते आणि त्याचा संचमान्यतेवर काय परिणाम होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. परंतु सध्यातरी राज्यातील शेकडो शाळांना व हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत निश्चितच सकारात्मक मानले जात आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed