मुंबई ‘मनपा’ निवडणूक: ‘रुद्र रिसर्च’च्या एक्झिट पोलची निकालांशी सुसंगतता; आकडेवारी ठरली तंतोतंत
मुंबई 'मनपा' निवडणूक: 'रुद्र रिसर्च'च्या एक्झिट पोलची निकालांशी सुसंगतता; आकडेवारी ठरली तंतोतंत
पुणे १७ जानेवारी २०२६ : पुणे: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये ‘रुद्र रिसर्च अँड ॲनालिटिक्स’ या संस्थेने वर्तवलेले एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये मोठी सुसंगतता दिसून आली आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुती तसेच इतर राजकीय आघाड्यांच्या जागांबाबत संस्थेने वर्तवलेला अंदाज वास्तवाच्या अत्यंत जवळ जाणारा ठरला आहे.
रुद्र रिसर्च अँड ॲनालिटिक्स’ या संस्थेने वर्तवलेले एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये मोठी सुसंगतता दिसून आली आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुती तसेच इतर राजकीय आघाड्यांच्या जागांबाबत संस्थेने वर्तवलेला अंदाज वास्तवाच्या अत्यंत जवळ जाणारा ठरला आहे.

महायुती आणि भाजपची कामगिरी
निवडणुकीपूर्वी ‘रुद्र रिसर्च’ने भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीला ११५ ते १३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालात महायुतीला ११८ जागा मिळाल्या आहेत. भाजप हा ८९ जागांसह महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, संस्थेने भाजपसाठी ८० ते ९० जागांचा आकडा दिला होता. तर शिवसेना (शिंदे) गटाला प्रत्यक्षात २९ जागा मिळाल्या आहेत.
विपक्षी आघाड्यांचे चित्र
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या संभाव्य कामगिरीबाबत संस्थेने ६७ ते ८२ जागांचे भाकीत केले होते. प्रत्यक्षात या गटाने ७१ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये शिवसेना (UBT) ६५ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. तसेच, काँग्रेस आणि घटक पक्षांना २२ ते २७ जागा मिळतील असे म्हटले होते, प्रत्यक्षात त्यांच्या २४ जागा निवडून आल्या आहेत.
१५ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या एक्झिट पोलमध्ये ‘ग्राउंड इंटेलिजन्स’ आणि डेटा विश्लेषणाचा आधार घेण्यात आला होता. संस्थेच्या मते, मतदारांचा कल आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ बसल्याने हा अंदाज अचूक ठरला आहे. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतही या संस्थेचे विश्लेषण महत्त्वाचे ठरले होते. मुंबई महापालिकेच्या या निकालांमुळे निवडणूक विश्लेषणात माहिती आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information