Spotify प्रिमियम सब्सक्रिप्शन महागले: जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं आता आणखी खर्चिक
Spotify प्रिमियम सब्सक्रिप्शन महागले: जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं आता आणखी खर्चिक Spotify प्रिमियम सब्सक्रिप्शन महागले: जाहिरातींशिवाय गाणी ऐकणं आता आणखी खर्चिक
Spotify ने आपल्या प्रिमियम प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. जाहिरातींशिवाय गाणी ऐकायचं असल्यास युजर्सना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
सायली मेमाणे
पुणे ७ ऑगस्ट २०२५ : Spotify हे ऑनलाईन म्युझिक स्ट्रीमिंगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे प्लॅटफॉर्म असून, लाखो युजर्स जुन्या-नव्या गाण्यांचा आनंद घेण्यासाठी या अॅपचा वापर करतात. मात्र आता Spotify वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
Spotify ने त्यांच्या प्रिमियम सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे, त्यामुळे आता जाहिरातींशिवाय गाणी ऐकण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. ही किंमतवाढ भारतातील युजर्ससह विविध देशांमध्ये लागू करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक सुधारणा, संगीताच्या कॅटलॉगमध्ये वाढ, आणि युजर अनुभव सुधारण्यासाठी झालेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही किंमतवाढ आवश्यक होती.
सध्या Spotify चे प्रिमियम युजर्स जाहिरात-मुक्त गाणी, ऑफलाईन ऐकण्याची सुविधा, तसेच उच्च दर्जाच्या ऑडिओचा अनुभव घेतात. किंमत वाढल्यानंतरही हे फायदे यथास्थित राहणार आहेत. मात्र, अनेक युजर्ससाठी ही वाढ जड जाणार असून, काही युजर्स फ्री व्हर्जनकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Spotify ने यापूर्वीही किंमतीत वाढ केली होती, पण यावेळी झालेली वाढ अधिक स्पष्ट आणि सर्व प्लॅन्सवर प्रभावी आहे. त्यामुळे म्युझिकप्रेमी युजर्सना आता आपल्या मासिक खर्चात Spotify साठी थोडी जास्त रक्कम राखून ठेवावी लागणार आहे.