Thane News: ठाणे पालिकेची पहिली CBSE शाळा 8 जूनपासून सुरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश आणि वाहतूक सुविधा

0
Thane News: ठाणे पालिकेची पहिली CBSE शाळा 8 जूनपासून सुरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश आणि वाहतूक सुविधा

Thane News: ठाणे पालिकेची पहिली CBSE शाळा 8 जूनपासून सुरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश आणि वाहतूक सुविधा

ठाणे महानगरपालिकेची पहिली CBSE शाळा खारेगाव येथे 8 जून 2026 पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तके, भोजन आणि वाहतूक सुविधा मिळणार असून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज शाळा उभारण्यात आली आहे.

पुणे ०३ जून २०२६ : ठाणे महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. खारेगाव येथे ठाणे महानगरपालिकेची पहिली सीबीएसई (CBSE) शाळा सुरू होणार असून येत्या 8 जून 2026 पासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. या उपक्रमामुळे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस’ या नावाने ही शाळा सुरू केली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नर्सरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून भविष्यात ही शाळा नर्सरीपासून बारावीपर्यंत विस्तारली जाणार आहे. शाळेच्या उद्घाटनापूर्वी सर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

खारेगावमधील सफायर रुग्णालयाजवळ उभारण्यात आलेली ही शाळा अत्याधुनिक सुविधा आणि आधुनिक शिक्षण पद्धतींनी सुसज्ज असेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि भाषा प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय क्रीडा आणि कला विभागासाठी स्वतंत्र जागा, खेळाचे मैदान, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि अग्निशमन सुविधा देखील असतील.

सध्या शाळेच्या इमारतीतील रंगरंगोटी, खिडक्यांवरील सुरक्षा ग्रिल आणि मैदानाच्या विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

या शाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

क्रिस्टल हाऊस व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळेत येण्या-जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था देखील पुरवली जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअर घडविण्यासाठी उच्च शिक्षण मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिका आणि क्रिस्टल हाऊस यांच्यात 30 वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे दीर्घकालीन स्वरूपात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळणार आहे.

सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेचा हा उपक्रम ऐतिहासिक मानला जात आहे. या शाळेमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम आणि आधुनिक शिक्षण सुविधा मोफत मिळणार असल्याने पालकांमध्येही उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *