Theur Crime: नदीपात्रात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, जय बजरंग लेखाने ओळख पटविण्यात आव्हान
नदीपात्रात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, जय बजरंग लेखाने ओळख पटविण्यात आव्हान
Theur, ता. हवेली येथे नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला; मृतदेहाच्या उजव्या हातावर ‘जय बजरंग’ लिहिलेले असून लोणी काळभोर पोलिस ओळख पटविण्याचे प्रयत्न करत आहेत.
सायली मेमाणे
पुणे १२ सप्टेंबर २०२५ : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या थेऊर गावाजवळील नदीपात्रात आज शुक्रवारी (ता.12) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे थेऊर आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने लोणी काळभोर पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिकांना बेऊर येथील नदीपात्रात एक व्यक्ती निचपित अवस्थेत पडलेला दिसला. नागरिकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार तेजस जगदाळे, योगेश पैठणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यावेळी वेऊरसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलीसांनी मृत व्यक्तीला ताब्यात घेत विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृतदेहावर कोणतीही ताजी जखम आढळली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यातील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 50 वर्षे असून, उंची सुमारे 165 सें.मी., शरीर बांधा मध्यम आहे. विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, मृतदेहाच्या उजव्या हातावर ‘जय बजरंग’ हा लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिन्हामुळे काही प्राथमिक माहिती मिळाली आहे, परंतु अद्याप खात्रीशीर ओळख पटवता आलेली नाही.
लोणी काळभोर पोलीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणालाही मृत व्यक्तीबाबत काही माहिती असेल तर त्यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाण्यास 020-29995260 या क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिस हे प्रकरण गंभीरपणे घेत असून पुढील तपास सुरु आहेत.
थेवूरमधील ही घटना परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक ठरली असून, सुरक्षा आणि नागरिकांच्या जागरूकतेबाबत संदेश देणारी ठरली आहे. स्थानिक पोलीस आणि नागरिकांमध्ये सहयोग वाढवून मृत व्यक्तीची ओळख लवकरात लवकर स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात सतर्कता वाढवण्याची गरज लक्षात येते. पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, अनोळखी व्यक्तींच्या बाबतीत योग्य माहिती त्वरित पोलीसांना द्यावी आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीबाबत सतर्क राहावे.