वसईमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या; पत्नीचा गळा कापून पतीने केला धोकादायक प्रयत्न

0
वसईमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या; पत्नीचा गळा कापून पतीने केला धोकादायक प्रयत्न

वसईमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या; पत्नीचा गळा कापून पतीने केला धोकादायक प्रयत्न

वसईमध्ये ८१ वर्षीय वृद्धाने दीर्घ आजारपणामुळे ७४ वर्षीय पत्नीची हत्या केली आणि स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला; पोलिसांची तपासणी सुरू.

सायली मेमाणे

पुणे ८ सप्टेंबर २०२५ : वसईमध्ये एक धक्कादायक आणि भयंकर घटना घडली आहे. ८१ वर्षीय गॅब्रियल परेरा यांनी दीर्घ आजारपणामुळे आणि मुलगा-सुनेला त्रास नको म्हणून आपली ७४ वर्षीय पत्नी आर्टिना परेरा यांची हत्या केली. दोघेही दीर्घकाळापासून मानेची, कंबर, गुडघे दुखी आणि इतर आजारांनी ग्रस्त होते.

शनिवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास गॅब्रियल परेरा यांनी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीवर हल्ला करून तिचा गळा कापून ठार मारला. यानंतर त्यांनी त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या मृत्यूसोबत झुंज देत आहेत.

घटनेवेळी दाम्पत्याचा मुलगा घराबाहेर गेला होता. परत आल्यावर घर आतून बंद असल्यामुळे त्याने दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. घराच्या आत त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आणि वडील गंभीर जखमी अवस्थेत आढळले. मुलाने तत्काळ पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

या घटनेनंतर वसई पोलिसांनी गॅब्रियल परेरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि स्थानिक पोलिस पुढील तपास सुरू ठेवले आहेत.

विशेष म्हणजे, ही घटना वृद्ध दांपत्याच्या दीर्घ आजारपणामुळे आणि कुटुंबीयांवर होणाऱ्या संभाव्य त्रासामुळे घडली असल्याचे समोर आले आहे. समाजात अशा मानसिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

वसईतील ही भयंकर घटना स्थानिक लोकांसाठीही धक्कादायक ठरली असून, घरातील वयस्कर नागरिकांसाठी काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करते.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *