Vasant More Post: “उरलेल्या 65 जागांवर निवडणुका घ्या राव” – वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

0
Vasant More Post: "उरलेल्या 65 जागांवर निवडणुका घ्या राव" – वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Vasant More Post: "उरलेल्या 65 जागांवर निवडणुका घ्या राव" – वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

पुणेतील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल फेसबुकवर नाराजी व्यक्त केली. “उरलेल्या 65 जागांवर तरी निवडणुका घ्या राव, लय कटाळा आलाय” या पोस्टमुळे चर्चा रंगली आहे.

सायली मेमाणे

पुणे १८ सप्टेंबर २०२५ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल चार वर्षांपासून रखडल्या आहेत. या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या, पण निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला तातडीने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय पटलावर हालचालींना वेग आला आहे. मात्र अद्याप निवडणुकीच्या तारखा घोषित झालेल्या नसल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसत आहे.

गेल्या काही वर्षांपासून इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी केली आहे. प्रचाराचा खर्च, कार्यकर्त्यांचे संघटन आणि मतदारांशी संपर्क यासाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. पण निवडणुका होणार की नाहीत, या अनिश्चिततेमुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. कार्यकर्त्यांचा वैताग आता सरळ सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागला आहे.

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला चार महिन्यांच्या मुदतीत निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. पावसाळा, ओबीसी आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न आणि तांत्रिक कारणे यामुळे शासनाने न्यायालयात विलंबाची कारणमीमांसा केली होती. पण आता न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की 31 जानेवारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी थेट भाष्य करत कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाचा फोडली आहे. मोरे यांनी फेसबुकवर लिहिले आहे – “व्हय मी काय म्हणतो… आज सकाळी चहा पिताना एक विचार मनात आलाय. भाजपा म्हणते पुण्यात आमचे 100 नगरसेवक निवडून येणार… मग माझे पुणे भाजपाला एक सांगणं आहे, तुम्हाला जर निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमचे 100 नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांची नावे जाहीर करून टाका. कृपा करून उरलेल्या 65 जागांवर तरी निवडणुका घ्या राव… लय कटाळा आलाय आणि ते इच्छुक तर पार पार बेजार झालेत खर्च करून करून…”

या पोस्टमुळे केवळ कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर नाही, तर नेत्यांचाही अस्वस्थपणा स्पष्ट झाला आहे. भाजपाच्या पुण्यातील ताकदीवर त्यांनी थेट भाष्य करत राजकीय टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांवर निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप विरोधकांकडून आधीपासून होत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे भाग आहे. कार्यकर्त्यांचा वाढता असंतोष, विरोधकांचा आक्रमक सूर आणि वसंत मोरे यांची थेट फेसबुक पोस्ट यामुळे या निवडणुकीच्या प्रश्नाने राज्य राजकारणात चांगलाच रंग चढवला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed