मुंबईत Volvo EX30 इलेक्ट्रिक SUV सादर; ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू
मुंबईत Volvo EX30 इलेक्ट्रिक SUV सादर; ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू
Volvo Cars India ने मुंबईत EX30 इलेक्ट्रिक SUV सादर केली. प्री-बुकिंग सुरू असून, अधिकृत किंमत सप्टेंबरअखेर जाहीर होणार. ऑक्टोबर 2025 पासून डिलिव्हरी सुरू.
सायली मेमाणे
पुणे १० सप्टेंबर २०२५ : मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत मागील काही वर्षांपासून प्रचंड वेगाने वाढ होत आहे आणि त्यातच Volvo Cars India ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक SUV, Volvo EX30 ची अधिकृतपणे भारतात एंट्री केली आहे. या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कारचे अनावरण मुंबईत करण्यात आले असून, इच्छुक ग्राहकांसाठी टेस्ट ड्राइव्हची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Volvo कार इंडियाने मुंबईतील KIFS Volvo Cars (अंधेरी पश्चिम आणि प्रभादेवी) शोरूममध्ये EX30 इलेक्ट्रिक SUV अनुभवण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. इच्छुक खरेदीदार येथे टेस्ट ड्राइव्ह घेऊन गाडीच्या डिझाईन, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीबाबत उत्सुकता असलेल्या ग्राहकांना गाडीचे वास्तविक परफॉर्मन्स तपासता येईल.
ग्राहकांसाठी विशेष सवलतीची संधीही देण्यात आली आहे. ज्यांनी कारची प्री-बुकिंग केली आहे, त्यांना गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळी विशेष डिस्काउंटचा लाभ मिळणार आहे. यामुळे प्री-बुकिंग करणाऱ्या खरेदीदारांना अतिरिक्त फायदा मिळणार असून, आगामी उत्सव काळात ही कार बाजारपेठेत अधिक आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
Volvo EX30 ही कंपनीची सर्वात कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV मानली जाते. जागतिक बाजारपेठेत ही कार प्रचंड लोकप्रिय झाली असून, तिचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्टायलिश डिझाईन आणि पर्यावरणपूरक ड्रायव्हिंग अनुभव हे विशेष वैशिष्ट्य मानले जात आहे. भारतीय बाजारात ती आली की, मध्यम व उच्च-स्तरीय इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये तिची स्पर्धा वाढेल.
कंपनीने जाहीर केले आहे की, EX30 ची अधिकृत किंमत सप्टेंबर 2025 च्या अखेरीस घोषित केली जाईल. त्यानंतर ऑक्टोबर 2025 पासून ग्राहकांना या इलेक्ट्रिक SUV ची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत उत्सुकता अधिकच वाढली आहे.
ऑटो एक्सपर्ट्सच्या मते, Volvo EX30 भारतीय बाजारात Tesla Model Y, Kia EV6 आणि BMW iX1 सारख्या गाड्यांना जोरदार स्पर्धा देऊ शकते. विशेषतः तिची सुरक्षितता वैशिष्ट्ये, ड्रायव्हिंग रेंज आणि Volvo च्या विश्वासार्ह ब्रँड इमेजमुळे ती शहरी ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहनात्मक धोरणे राबवली जात आहेत. सबसिडी, करसवलत आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ यामुळे ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक होत आहे. अशा परिस्थितीत Volvo EX30 सारख्या गाड्या बाजारपेठेला नवे बळ देऊ शकतात.
सध्या मुंबईसह प्रमुख शहरांतील ग्राहकांमध्ये या कारबाबत उत्सुकता दिसून येत आहे. टेस्ट ड्राइव्ह बुक करण्यासाठी आणि प्री-बुकिंगसाठी KIFS Volvo Cars शोरूमशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.