Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल, घाटमाथ्यावर यलो अलर्ट

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल, घाटमाथ्यावर यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, पुणे-सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा यलो अलर्ट, उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता. संपूर्ण अपडेट वाचा.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : जुलै महिन्याच्या अखेरीस पश्चिम महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून काही भागांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर संततधार कायम असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात ऊन-सावलीच्या खेळासह हलक्या सरी राहण्याचा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत २.१ मिमी पाऊस पडला असून घाटमाथ्यावर जोर कायम आहे. कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी घाटमाथ्यावर यलो अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्यातही मध्यम पावसासह ५ मिमी पावसाची नोंद झाली असून तापमान २५.६ अंशांवर स्थिर आहे. येथील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये मागील २४ तासांत ६ मिमी पाऊस पडला, तापमान २४.९ अंश होते. सध्या पावसाची उघडीप असून धरणक्षेत्रात पाऊस सुरू आहे.
सोलापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला असून कमाल तापमान ३१.८ अंशांवर पोहोचले आहे. पुढील २४ तासांत ३२ अंश पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात ३ मिमी पावसासह ढगाळ वातावरण राहणार असून तापमान २२ ते २८ अंश दरम्यान राहील. श्रावणात सुरुवातीच्या पावसानंतर सध्या तुरळक सरींचा कालखंड सुरु असून पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter