कर्जत : पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात 1 ठार, 5 जखमी; दिवाळीच्या सणात हृदयद्रावक घटना

0
पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात 1 ठार, 5 जखमी; दिवाळीच्या सणात हृदयद्रावक घटना

पिसाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात 1 ठार, 5 जखमी; दिवाळीच्या सणात हृदयद्रावक घटना

कर्जत दहिवली परिसरात पिसाळलेल्या बैलाच्या धुमाकूळामुळे 1 नागरिक ठार, 5 जखमी; हेल्प फाउंडेशनने बैलाला पकडून नियंत्रित केले, प्रशासनने नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिला.

सायली मेमाणे

पुणे २३ ऑक्टोबर २०२५ : कर्जत शहरातील दहिवली परिसरात दिवाळीच्या सणात हृदयद्रावक घटना घडली. पिसाळलेल्या बैलाने धुमाकूळ घालत तीन नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला, यात एकाचा मृत्यू झाला असून पाच जखमी झाले आहेत. या हल्ल्याची घटना 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान घडली.

या प्रकरणात 9 वर्षांचा बालक आदित्य कनोजियावर रात्री जखमी होण्याची नोंद झाली. त्यानंतर 23 ऑक्टोबरच्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर आलेल्या मंजुळा चव्हाण (वय 65) आणि योगिता थोरवे (वय 44) यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात बैलाने जोरदार हल्ला केला. मंजुळा चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना पनवेल येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

संजयनगर येथे राहणाऱ्या 70 वर्षीय अर्जुन म्हसे यांच्यावरही बैलाने हल्ला करून गंभीर दुखापत केली. दुर्दैवाने या हल्ल्यात अर्जुन म्हसे यांचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी दोन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि नगरपरिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हेल्प फाउंडेशनच्या गुरुनाथ साठेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाने धाडसाने प्रयत्न करून बैलाला नियंत्रणात आणले. या मोहिमेदरम्यान परिसरातील राज्य मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला.

पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणले आणि नागरिकांना शांततेचे आवाहन केले. माजी नगरसेवक संकेत भासे यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली. घटनास्थळी नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून प्रशासनाने अतिरिक्त दक्षता घेतली आहे.

कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा ठप्प झाला असून, शेतीसही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेतून शहरवासीयांनी पिसाळलेल्या जनावरांबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *