कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी: मोक्का आरोपी हर्ष जाधवला 10 महिन्यांनंतर अटक

कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी: मोक्का आरोपी हर्ष जाधवला 10 महिन्यांनंतर अटक
कोंढवा पोलीसांनी मोक्का आणि गंभीर गुन्ह्यांतील 10 महिन्यांपासून फरार असलेल्या हर्ष संतोष जाधव याला शिताफीने अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत झाली.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक कारवाई पार पडली आहे. मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यात तब्बल 10 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हर्ष संतोष जाधव याला कोंढवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांनी परिमंडळ हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली होती. याच मोहिमेअंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई झाली आहे.
दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस अंमलदार विकास मरगळे व पुष्पेंद्र चव्हाण यांना बातमी मिळाली की मोक्का गुन्ह्यातील आरोपी श्रीराम चौक, कात्रज कोंढवा रोड परिसरात दिसणार आहे. ही माहिती सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सापळा लावून कारवाई केली.
काही वेळात आरोपी हर्ष संतोष जाधव त्या ठिकाणी दिसताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम ११८, १८९, १९०, १०९, शस्त्र कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोक्का कायद्यानुसार गुन्हे दाखल होते. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, सहा. आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात राकेश जाधव, नवनाथ जगताप, विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहास मोरे, लक्ष्मण होळकर, विशाल मेमाणे, सुजित मदन, संतोष बनसुडे यांच्यासह एकूण २० हून अधिक पोलिसांचा समावेश होता. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आघात झाला असून पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेचा उत्तम प्रत्यय आला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter