गोवा राज्यातून पुण्यात मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड — १.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

0
गोवा राज्यातून पुण्यात मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड — १.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

गोवा राज्यातून पुण्यात मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड — १.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या ५७,७९२ बाटल्यांसह १.३३ कोटींचा अवैध मद्यसाठा सासवड येथे पकडला.

सायली मेमाणे

पुणे १२ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत १.३३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सासवड परिसरातील वीर फाटा-जेजुरी रोडवर करण्यात आली असून, गोवा बनावटीच्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ५७,७९२ बाटल्या तस्करी करताना सापडल्या.

दि. ११ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड विभागाच्या पथकाने टाटा कंपनीच्या सहाचाकी एलपीटी (१२१२) मालवाहतूक कंटेनर क्रमांक MH-49-AT-3471 याची वीर फाटा येथे थांबवून तपासणी केली. तपासणीत कंटेनरमध्ये १८० मि.ली क्षमतेच्या १,२०४ बॉक्स (प्रत्येकी ४८ बाटल्या) मध्ये एकूण ५७,७९२ बाटल्या सापडल्या.

एकूण जप्त केलेल्या मद्यसाठ्याची किंमत ₹१,१५,५८,४००/- असून, वाहन व मोबाईलसह मिळून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹१,३३,७८,४००/- इतकी आहे. या प्रकरणात चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९०, १०३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. आयुक्त राजेश देशमुख, सह-आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, आणि विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे, दु.नि. रोहित माने, धवल गोलेकर, शितल शिंदे, दु.नि. सागर धुर्वे, संदीप मंडिवेकर आणि जवान तात्या शिंदे, अमोल कांबळे, दत्तात्रय पिलावरे, संजय गोरे, बाळासो आढाव यांचा सहभाग होता. वाहनचालक अंकुश कांबळे यांनीही कारवाईत साथ दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे, राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग हे करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

सार्वजनिक हिताच्या दृष्टीने नागरिकांनी अशा अवैध मद्य तस्करीबाबत माहिती मिळाल्यास 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 020-26058633 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed