ठाणे वर्षा मॅरेथॉन २०२५: धर्मेंद्र आणि रविना गायकवाड विजेते, २५ हजार धावपटूंचा उत्साही सहभाग

0
ठाणे वर्षा मॅरेथॉन २०२५: २५ हजार धावपटू, धर्मेंद्र व रविना गायकवाड विजेते, ₹१० लाखांची बक्षिसे

ठाणे वर्षा मॅरेथॉन २०२५: २५ हजार धावपटू, धर्मेंद्र व रविना गायकवाड विजेते, ₹१० लाखांची बक्षिसे

३१वी ठाणे वर्षा मॅरेथॉन २०२५ मध्ये २५ हजार धावपटूंचा सहभाग. पुरुष गटात धर्मेंद्र तर महिला गटात रविना गायकवाड विजेते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही धावण्याचा आनंद, विजेत्यांना एकूण ₹१० लाखांची बक्षिसे.

सायली मेमाणे

पुणे ११ ऑगस्ट २०२५ : ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३१वी ठाणे वर्षा मॅरेथॉन रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. “मॅरेथॉन ठाण्याची, उर्जा तरुणाईची” या घोषवाक्याखाली झालेल्या या स्पर्धेत २५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला.

पुरुष गटात पुण्याच्या एएसआयचे धर्मेंद्र यांनी २१ किमी अंतर १ तास ०७ मिनिटे ४१ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाड यांनी १ तास २५ मिनिटे ४६ सेकंदात शर्यत पूर्ण करून अव्वल स्थान मिळवले.

स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःही काही अंतर धावत धावपटूंना प्रोत्साहित केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान इंग्लंड-फ्रान्स सागरी अंतर पोहून पार करणाऱ्या आयुषी कैलास आखाडे, आयुष प्रवीण तावडे, मानव राजेश मोरे या जलतरणपटूंचा सत्कार करण्यात आला, तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट शौर्या अविनाश अंबुरे आणि स्मिता जावळे यांचाही गौरव करण्यात आला. एकूण १२ गटातील स्पर्धा पार पडल्या ज्यात कॉर्पोरेट रन, ज्येष्ठ नागरिक गट, दिव्यांग त्रिदल गट यांचा समावेश होता.

महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक आणि ६० वर्षावरील स्पर्धकांनी विशेष उत्साह दाखवला. या वर्षी विजेत्यांना एकूण ₹१०,३८,९०० किंमतीची रोख बक्षिसे वितरित झाली. २१ किमी स्पर्धेतील विजेत्यांना ₹१ लाख रोख, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. पाच वर्षांच्या खंडानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉन पुन्हा सुरू झाल्याने शहराच्या क्रीडा आणि आरोग्य संस्कृतीला नवी उर्जा मिळाल्याचे सर्वांनी व्यक्त केले.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *